महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray: वेदांता फॉक्सकॉन वादावर राज ठाकरे स्पष्टचं बोलले

पत्रकार परिषद घेत वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केलं

अंकिता खाणे (Ankita Khane)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केलं आहे. काही दिवसांपासून चर्चेत आलेला विषय वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरतला हलवला यावर त्यांनी मत व्यक्त केलं आहे. याधीचा संदर्भ देत ते म्हणाले की, जेव्हा एखादा प्रकल्प आपल्याकडे येतो तेव्हा त्यासाठीच्या पायाभूत सुविधा असणे गरजेचे आहे.

गुजरातने चांगली ऑफर दिल्याने प्रकल्प गुजरतला गेला असल्याचंही ते म्हणालेत. औद्योगिक गोष्टींकडे राज्याचं दुर्लक्ष झाल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला आहे. राज्यात आलेला उद्योग बाहेर का गेला याची चौकशी झाली पाहिजे असंही राज ठाकरे म्हणालेत.

राज्यात फक्त उद्योग येत नाही तर त्यासोबत रोजगार निर्मिती होते, भागाचा विकास होतो. महाराष्ट्र मोठा होण्याचं कारणच हेच आहे. भारतामध्ये येणाऱ्या उद्योगांची पहिली पसंती महाराष्ट्र असतो. यामुळे आपली आर्थिक स्थिति सुधारते. बाहेरच्या देशातून येणाऱ्या उद्योगांना महाराष्ट्रात येण्यासाठी पहिली पसंती मिळते हे राज्याचं भाग्य असेल तर तो आपण स्वत:च्या हाताने उद्योग घालवतोय यासारख दुसर दुर्दैव नाही असंही राज ठाकरे म्हणालेत. तसंच येणाऱ्या उद्योगाकडून पैसे मागितल्यास कोन येईल असंही ते म्हणालेत. गुजरातने जास्त पैसे दिल्यामुळे वेदांता गुजरतला गेला असल्याचा अंदाजही राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

राज ठाकरे यांनी बोलताना विलासराव देशमुख यांच्याबद्दलचा एक किस्साही शेअर केला आहे. विलासरावांच्या काळात आलेला उद्योग तामिळनाडूत गेल्याचा किस्साही यावेळी सांगितला आहे.

फॉस्ककॉन प्रकरणाची चौकशी व्हावी असंही राज ठाकरे म्हणाले. राज्यात आलेला उद्योग बाहेर जातोच कसा? असा सवाल करत नेमकं कुठं फिस्कटलं याची चौकशी व्हावी, असं राज ठाकरे म्हणाले. या प्रकरणात पैशांची मागणी केली गेली आहे का याचीही चौकशी व्हावी असं ते म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Rule: फ्रँचायझींकडून हरकती अन् आयपीएलच्या फॉरमॅटमध्ये बदल; वादग्रस्त नियम हटवणार? BCCI च्या Emailमध्ये नेमकं काय?

Mohan Bhagwat Canada Visit : भारत 'महाशक्ती' की ‘विश्वगुरू’ ? कॅनडातील भाषणात मोहन भागवतांनी सांगितला भारतीय विचार

Kolhapur Wildlife News : गगनबावड्यात आढळला साडेपाच फूट लांबीचा अजगर; ग्रामस्थांची उडाली भंबेरी, वन विभागाच्या प्रसंगावधानाने टळला मोठा धोका

Pune Crime: कौटुंबिक वादातून मुलाकडून आईला बेदम मारहाण; उपचारांपूर्वीच मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना यवत पोलिसांची नोटीस; आक्रोश मोर्चाबाबत महत्त्वाच्या सूचना

SCROLL FOR NEXT