aryan khan cordelia cruise 
महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअॅपच्या बॅकअप फाईलवर आर्यनचं नाव, मनिष भंगाळेचा दावा

ओमकार वाबळे

आर्यन खानच्या ड्रग्ज खटल्यात अद्याप कोणालाही दिलासा मिळालेला नाही. त्यातच कारवाई करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे विविध प्रकरणांमध्ये अकडल्याचं चित्र आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणात काही षडयंत्र असल्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, दिवसेंदिवस नवी प्रकरणं, नवे चेहरे समोर येत असताना आणखी एका व्यक्तीने यामध्ये उडी घेतली आहे.

एकनाथ खडसे यांचे कुख्यात गुंड दाऊदशी संबंध असल्याचे प्रकरण समोर आले होते. यातील प्रमुख व्यक्ती हॅकर मनिष भंगाळे याने मोठा दावा केला आहे. त्याने मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे.

या पत्रात भंगाळेने दोन व्यक्तींवर आरोप केले आहेत. या दोन व्यक्तींनी त्याला प्रभाकर साईलच्या नावाने सिमकार्ड इश्यू करण्यासाठी सांगितले. प्रभाकर साईल हा किरण गोसावीचा बॉडीगार्ड होता. गोसावीचा आर्यनसोबतचा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर तो अद्याप फरार आहे. त्याने पंच म्हणून या प्रकरणात भूमिका निभावल्याचा दावा एनसीबीने केलाय.

भंगाळेला भेटलेल्या दोन व्यक्तींनी त्याला व्हॅाट्सअॅपचा बॅकअप घेण्यासाठी विनंती केली. या व्हॉट्सअॅप बॅकअपवर आर्यन खान असं नाव होतं, अशी माहिती भंगाळेने दिली. या कामासाठी त्याला पाच लाख रुपयांची ऑफर देण्यात आली. तसेच 10 हजार अॅडव्हान्सही देण्यात आल्याचा दावा त्याने केला आहे. यासारख्या अनेक गोष्टी त्याने पत्रात नमूद केल्या आहेत.

कोण आहे भंगाळे?

मनिष भंगाळे हा हॅकर आहे. एकनाथ खडसे यांचे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे प्रकरण समोर आले होते. त्याने बोगस मोबाईल बिल बनवून खडसे आणि दाऊद यांच्यात संभाषण झाल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर मुंबई सायबर सेलने भंगाळेला अटक केली होती. आता या खुलास्यानंतर प्रकरण आणखी वळण घेऊ शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT