Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: २० जानेवारीला मराठे मुंबईकडे कूच करणार...; जरांगेंच्या भूमिकेवर CM एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sandip Kapde

Eknath Shinde: मनोज जरांगे यांनी बीड येथील इशारा सभेत २० जानेवारीला मुंबईत आझाद मैदान, शिवाजी पार्क मैदानावर आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली. यावेळी जरांगे यांनी राज्य सरकारला देखील गंभीर इशारा दीला आहे. शहाणपणाची भूमिका घ्या, आमच्यावर डाव टाकू नका, असे जरांगे म्हणाले.

दरम्यान मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्ट २४ जानेवारीला क्युरेटिव्ह पिटीशन ऐकणार आहे. कोर्टाने महाराष्ट्रातील जनभावनेचा आदर राखला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने हा फार मोठा निर्णय आहे. त्यामुळे मी कोर्टाचे आभार मानतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

२४ तारखेला आमची तज्ज्ञ वकिलांची फौज कोर्टा भूमिका मांडेल. मला वाटते यातून मराठा समाजाला न्याय मिळेल. महाविकास आघाडी सरकारने पुरावे मांडले नव्हते. त्यामुळे अपयश आलं, असे शिंदे म्हणाले.

सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरु होईल. त्यामुळे सर्वांनी संयम राखला पाहिजे. सगळ्यांचे मत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे. सुप्रीम कोर्टात बाजू मांडून आरक्षण कसं मिळेल, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.  (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT