Manoj Jarange Patil  esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange Patil: प्रकृती खालावली तरी जरांगे पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना; फडणवीसांवरील टीकेमुळे भाजप आक्रमक! कसं असेल पुढचं आंदोलन?

Manoj Jarange Patil: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील मराठा प्रभाव संपवायचा आहे, असा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी आज केला.

Sandip Kapde

Manoj Jarange Patil: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील मराठ्यांचा प्रभाव संपवायचा आहे, असा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी आज केला. फडणवीस यांनी मराठा समाजाच्या विरोधात कट रचल्याचा आरोप करत मनोज जरांगे उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील निवासस्थान सांगर बंगल्याकडे रवाना झाले आहेत. मनोज जरांगे यांनी प्रथमच देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका केली. देवेंद्र फडणवीस यांना माझा बळी हवा आहे, मी रस्त्यात मलो तरी मला सागर बंगल्यावर न्या, असे देखील जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे यांची प्रकृती देखील खालावली आहे. उपोषण सुरु असताना जरांगे मुंबईकडे निघाले आहे. महाराष्ट्र सरकारने विषेश अधिवेशनात मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण दिले आहे. मात्र हे आरक्षण मनोज जरांगे यांना मान्य नाही. ओबीसीतून आरक्षण द्या आणि सगेसोयरे संदर्भात कायदा करा, अशी मागणी करत मनोज जरांगे मुंबईकडे निघाले आहे.

“देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील मराठा समाजाचा प्रभाव संपवायचा आहे आणि त्यांना सेगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण करायचे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार फडणवीसांपुढे हतबल आहेत. फडणवीसांच्या इच्छेशिवाय राज्यात काहीही होऊ शकत नाही. फडणवीस देखील मराठा समाजात फूट पाडा आणि राज्य करा या राजकारणाचा वापर करत आहेत. अजय बारस्कर यांनी केलेल्या खोट्या आरोपामागे तेच सूत्रधार आहेत”, असे जरांगे-पाटील म्हणाले.

मुंबईत तातडीची बैठक -

दरम्यान मनोज जरांगे मुंबईत येणार म्हणून मुंबईतील मराठा समाज देखील सतर्क झाला असून त्यांनी बैठक बोलावली आहे. या सर्व प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी बोलण्यास नकार दिला. माहिती घेऊन बोलतो असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे पोलीस मनोज जरांगे यांना अडवणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कसा असेल मार्ग -

मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथून सागर बंगल्यावर जाण्यासाठी निघाले आहेत. त्यांनी अंतरवाली सराटी येथील भांबेरी (जालना) पैठण मार्गे शेवगाव मार्गे मुंबईला जाणार आहेत. ते ज्या रस्त्यावरुन जाणार आहेत त्या रस्त्यावर पोलिसांचा फौजफाटा वाढायला सुरुवात झाली आहे. 

बच्चू कडू यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. मनोज जरांगे यांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असे बच्चू कडू म्हणाले. मनोज जरांगे यांनी एक बैठक घ्यावी आणि नंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवावी, असे ते म्हणाले.

भाजप आमदार आक्रमक-

भाजप आमदार नितेश राणे आणि प्रसाद लाड आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे यांनी नौटंकी बंद करावी, त्यांना आधी देखील सांगितलं होत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करु नका. मराठा समाजावर देवेंद्र फडणवीस यांचे खूप उपकार आहेत, असे लाड म्हणाले. तर मनोज जरांगे सागर बंगल्यावर आले तर आम्ही  शांत बसणार का?, असा इशारा नितेश राणे यांनी दिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : अपात्र लाडक्या बहिणींवर सरकारने आतापर्यंत किती रुपये खर्च केले? या पैशातून करता आली असती 'ही' मोठी कामे

LPG Alternative : LPG च्या टेन्शनपासून होणार सुटका ! आता एका क्लिकवर मिळणार PNG कनेक्शन, गॅसचा खर्चही होणार कमी, काय आहे सरकारची योजना?

Kolhapur Rape Case : ओळखपत्र करून देण्याचा बहाणा, तरुणीवर सामूहिक वारंवार अत्याचार; फोटो, व्हिडिओ व्हायरलची धमकी, पोलिसांनी मोबाईल घेतला अन्

Latest Marathi News Live Update : मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, अनेक सखल भागांत पाणी साचले

Shirol Tehsildar protest : शिरोळ तहसीलदारांसह पाच अधिकाऱ्यांना कोंडले, पंचगंगा प्रदूषणप्रश्नी आंदोलक संतप्त

SCROLL FOR NEXT