manoj jarange stay at vashi maratha reservation protest navi mumbai  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : जरांगेंचा मुक्काम वाशीत,मराठा बांधवासाठी पुन्हा एकदा प्रेमाची चटणी भाकरीचे आवाहन

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा विराट मोर्चा शुक्रवारी पहाटे मुंबई च्या वेशीवरील नवी मुंबईत धडकला आहे. शुक्रवारी हा मोर्चा मुंबईकडे रवाना होणार होता.

शरद वागदरे

Navi Mumbai : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा विराट मोर्चा शुक्रवारी पहाटे मुंबई च्या वेशीवरील नवी मुंबईत धडकला आहे. शुक्रवारी हा मोर्चा मुंबईकडे रवाना होणार होता. पण शासनाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या असणाºया मागण्या मान्य न करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

पण आध्यादेश न दिल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे न घेता शनिवारी मुंबईकडे आगेकुच करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील शिवाजी चौकांमध्येच मनोज जरांगे पाटील थांबणार असून शनिवारी सकाळी अकरा वाजता मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेणार आहे.

मराठा समाजाचा मोर्चा मुंबईकडे जात असताना मराठा समाज बांधवाची राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था ही एपीएसमी मार्केट मध्ये करण्यात आली होती. तर आता शुक्रवारचा मुक्कम देखील आता नवी मुंबईतच होणार असल्यामुळे मराठा बांधवाची जेवणाची व्यवस्था करण्यासाठी नवी मुंबईतील मराठा बांधवाना पुन्हा एकदा प्रेमाची चटणी भाकर देण्याचे आवाहन जारंगे पाटील यांनी केले आहे.

मराठा बांधवाचा मोर्चा नवी मुंबईत येणार असताना शहरातील मराठा कुटुंबानीच नव्हे तर इतर सामाजातील नागरिकांनी देखील चटणी भाकरी त्याचप्रमाणे आवश्यक ते मदत देखील केली होती. पण आजचा मोर्चा नवी मुंबईतच राहणार असल्यामुळे पुन्हा त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी आवाहन करण्यात आल्यामुळे स्वयंसेवकांकडून पुन्हा एकदा मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

SCROLL FOR NEXT