Mansingrao Naik,Jayashree Patil
Mansingrao Naik,Jayashree Patil Sakal
महाराष्ट्र

जिल्हा बँक अध्यक्षपदी मानसिंगराव नाईक; उपाध्यक्षपदी जयश्री पाटील

सकाळ वृत्तसेवा

३० वर्षानंतर मिळाला शिराळा तालुक्याला अध्यक्षपदाचा मान. निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी करत ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजराकरण्यात आला.

सांगली : जिल्हा मध्यवर्ती (Sangli Bank Election)सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक (Mansingrao Naik) यांची तर उपाध्यक्षपदी श्रीमती जयश्री पाटील (Jayashree Patil)यांची बिनविरोध निवड करण्यात आली. श्रीमती पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे पहिल्यांदाच महिला संचालकांना हा बहुमान मिळाला आहे. निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी करत ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजराकरण्यात आला. नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यासाठी जिल्हाबँकेचा परिसर गजबजून गेला होता.

जिल्हा बँकेसाठी २१ नोव्हेंबरला मतदान होऊन २३ नोव्हेंबरला मतमोजणी झालीहोती. राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्या महाआघाडीच्या सहकारपॅनेलने १७ तर भाजप प्रणित शेतकरी विकास पॅनेलने ४ जागांवर विजय मिळवला.महाआघाडीची सत्ता आल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपदाबाबत उत्सुकता होती.अध्यक्षपदावर आमदार मानसिंगराव नाईक यांचा प्रबळ दावा होता. त्यामुळेत्यांची निवड ही निश्‍चितच होती. तर उपाध्यक्षपदी कॉंग्रेसच्या श्रीमतीजयश्री पाटील यांचेच नाव चर्चेत होते.

आज दुपारी सव्वा तीन वाजता बँकेच्या राजारामबापू पाटील सभागृहात सर्वसंचालकांच्या उपस्थितीत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम सुरूझाला. निवडणूक निर्णय अधिकारी निळकंठ करे, सहाय्यक अधिकारी उर्मिलाराजमाने, सुनिल चव्हाण यांची उपस्थिती होती. अध्यक्षपदासाठी आमदार नाईक व उपाध्यक्षपदासाठी श्रीमती जयश्री पाटील यांचा एकमेव अर्ज असल्यामुळेबिनविरोध निवड झाली. आमदार नाईक यांच्या निवडीसाठी सूचक म्हणून मावळतेअध्यक्ष दिलीप पाटील होते. तर आमदार अनिल बाबर यांनी अनुमोदन दिले.श्रीमती पाटील यांच्या निवडीसाठी सूचक म्हणून मावळते उपाध्यक्षसंग्रामसिंह देशमुख होते. तर पृथ्वीराज पाटील यांनी अनुमोदन दिले.निवडीनंतर संचालक मंडळाच्यावतीने नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.

निवडीनंतर अध्यक्ष आमदार नाईक म्हणाले, ‘‘अध्यक्षपदासाठी जलसंपदामंत्रीजयंत पाटील, राज्यमंत्री विश्‍वजीत कदम, आमदार अनिल बाबर आणि भाजपच्यासंचालकांनी विश्‍वास दाखवला. सर्वांनी मला काम करण्याची संधी दिली.शेतकऱ्यांची बँक आणखी प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्नशील राहीन. तसेचबँकेच्या नविन योजना ११ डिसेंबरपर्यंत जाहीर करून त्या पूर्ण करण्यासाठीपाठपुरावा केला जाईल. शिराळासारख्या डोंगरी भागाला ३० वर्षानंतर बँकेचे अध्यक्षपद मिळाले आहे. निश्‍चितच शेतकऱ्यांना अभिप्रेत असणारे काम केलेजाईल. निकोप वातावरणात एकोप्याने पुढे जाऊ. बँकेच्या थकबाकी वसुलीचीप्रक्रिया मार्चपर्यंत पूर्ण केली जाईल. ज्या अडचणी असतील त्या निश्‍चित सोडवल्या जातील.’’

उपाध्यक्ष श्रीमती पाटील म्हणाल्या, ‘‘नेते मंडळी आणि सर्व संचालकांनीएकमताने निवड केल्याबद्दल आभार मानते. संचालक मंडळाच्यावतीने शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील. महिला बचतगट व त्यांना उद्योगासाठी मदत केलीजाईल. स्वर्गीय मदनभाऊंनी जो आदर्श घालून दिला आहे, त्याप्रमाणे चांगले काम केले जाईल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT