Eknath Shinde and Manoj Jarange Patil  
महाराष्ट्र बातम्या

Maratha Andolan : दिल्लीत मला विचारलं जरांगे पाटील है कौन? CM शिंदेंनी सांगितली आठवण

रवींद्र देशमुख

मुंबई - बहुचर्चित मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं जालना जिल्ह्यातील उपोषण आज अखेर संपुष्टात आलं. मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली. त्याचवेळी त्यांनी जरांगे पाटील यांचं कौतुक केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा समाजाला अधिकार मिळाला पाहिजे, मराठ्यांचे दुसऱ्या जातीशी कोणतेच मतभेद नाहीत, त्यामुळे रद्द झालेलं आरक्षण देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्द आहे. कुणावरही अन्याय न करता आम्ही ते देणार आहोत.

मुख्यमंत्री शिंदे पुढं म्हणाले की, जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मनोज सारखं स्वस्थ बसणार नाही. मराठा समाज आणि सरकार काही वेगळं नाही. त्यामुळे प्रोटोकॉल बाजूला ठेवून मनोजला भेटायचं मी ठरवलं होतं. दिल्लीत गेलो त्यावेळी मला विचारणयात आलं मनोज जरांगे पाटील है कौन? त्यावेळी मी म्हटलं जरांगे पाटील साधा कार्यकर्ता आहे. मनोज तुझा प्रामाणिक पणा आहे, म्हणून आम्ही सगळ्यांनी बैठक घेतली घेतल्याचही शिंदे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT