Maratha Reservation case OBC leader Prakash Shendge esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या पाठीमागे राजकीय शक्ती उभी; OBC नेते प्रकाश शेंडगेंचा गंभीर आरोप

मनोज जरांगे - पाटील हे ओबीसीच्या समर्थनार्थ बोलणाऱ्यांवर आरोप करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही त्यांचे 160 उमेदवार पाडू असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.

परभणी : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या पाठीमागे कुठली तरी राजकीय शक्ती उभी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण, आगामी काळात निश्चित त्यांच्या मागे कोणाचा राजकीय वरदहस्त आहे हे पुढे आल्याशिवाय राहणार नाही, असे मत ओबीसीचे नेते प्रकाश शेंडगे (OBC leader Prakash Shendge) यांनी व्यक्त केले.

येथील माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे यांच्या निवासस्थानी ओबीसी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस भगवानराव वाघमारे, स्वराजसिंह परिहार, कीर्तिकुमार बुरांडे यांच्यासह समाजातील आजी-माजी लोकप्रतिनिधी व अनेक नेते मंडळी उपस्थित होते. या बैठकीस प्रकाश शेंडगे यांनी मार्गदर्शन केले.

शेंडगे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून राज्यात ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षणाचा मुद्दा अधिक चर्चिला जात आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे - पाटील हे ओबीसीच्या समर्थनार्थ बोलणाऱ्यांवर आरोप करत आहेत. ओबीसीचे नेते मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर त्यांनी आरोप करून त्यांना निवडणुकीत पाडण्याची भाषा करत आहेत. मग आम्ही सुद्धा शांत कसे राहू असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांचा विरोध असल्याचे पुढे येत आहे. ओबीसी समाजाची बाजू मंत्री छगन भुजबळ लावून धरत असल्याने त्यांना लक्ष केले जात आहे. आगामी निवडणुकीत ते कसे निवडून येतात अशी भाषा वापरली जात आहे. त्यामुळे आम्ही ही शांत कसे बसणार.

तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही त्यांचे 160 उमेदवार पाडू असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला. मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे कुठली तरी राजकीय शक्ती उभी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण, आगामी काळात निश्चित त्यांच्या मागे कोणाचा राजकीय वरदहस्त आहे हे पुढे आल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT