st bus 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: मराठा आंदोलनाची झळ आता STला बसली! राज्यातील तब्बल इतके आगार केले बंद

सकाळ डिजिटल टीम

Maratha Reservetion :जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणामुळे राज्यभरात पडसाद उमटू लागले आहेत. गावखेड्यांतील सर्वसामान्य मराठा बांधव रस्त्यांवर येत असून काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

अशा घटनांत एसटी महामंडळाचेही नुकसान झाल्याने सोमवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत पाच दिवसात १३ एसटी बसची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील ३६ आगार बंद ठेवण्यात आले आहेत.

जालना, लातूर, नांदेड, परभणी हे आगार बंद करण्यात आले आहेत. एकूणच मराठा आरक्षण आंदोलनाचा मराठवाड्यात सर्वाधिक परिणाम झाला आहे, तर मुंबई, नागपूर, कोकण, पुणे, अमरावती या विभागांमधील एसटीची सेवा सुरळीत सुरू आहे.

स्थानिक पोलिस प्रशासनाच्या संमतीनेच एसटीची सेवा सुरू करावी; अन्यथा परिस्थिती सामान्य होईपर्यंत एसटीचे आगार बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळ प्रशासनाने दिली आहे. यामुळे एसटीचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे.

हे आगार बंद

  • छत्रपती संभाजीनगर: दोन, गंगापूर, पैठण

  • बीड : बीड, धारूर, अंबाजोगाई, पाटोदा, माजलगाव, परळी, गेवराई

  • जालना: अंबड, जाफराबाद, जालना, परतूर

  • लातूर : लातूर, औसा, निलंगा, अहमदपूर, उदगीर

  • नांदेड : किनवट, माहूर, नांदेड, भोकर, मुखेड, देगलूर, कंधार, हदगांव, बिलोली

  • धाराशिव : कळंब

  • परभणी : पाथरी, हिंगोली, कळमनुरी, गंगाखेड, परभणी, जिंतूर, वसमत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajnath Singh: संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचा इशारा: भारतीय नौदल फक्त समुद्राचे नाही तर देशाच्या आर्थिक सुरक्षेचे मुख्य आधार आहे

Nashik News : नाशिकमध्ये ३९१ गणेश मंडळांना पोलिसांची परवानगी; महापालिकेकडून ४५५ मंडळांना ग्रीन सिग्नल

Saurabh Bhardwaj: भारद्वाज यांच्या निवासस्थानी छापे; बांधकाम गैरव्यवहारप्रकरणी ईडीची कारवाई, ‘आप’कडून टीकास्त्र

Nashik Ganeshotsav 2025 : नाशिकमध्ये गणरायाच्या आगमनाचा उत्साह शिगेला, बाजारपेठा गजबजल्या

R Ashwin Retirement: IPL निवृत्तीनंतर काय करणार अश्विन? परदेशात खेळायचे असेल, तर BCCI चा नियम काय?

SCROLL FOR NEXT