Maratha Reservation Kunbi certificate esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : जातप्रमाणपत्र वाटपात मराठवाड्याची उपेक्षाच; आठ जिल्ह्यांत फक्त १४२ मराठा- कुणबी दाखल्यांचे वितरण

राज्यात विशेषतः मराठवाड्यात मराठा-कुणबी जातप्रमाणपत्र वाटपावरून मराठा आंदोलकांकडून रोष व्यक्त होत असतानाच आता याबाबत वेगळीच माहिती समोर आली आहे.

दीपा कदम

मुंबई - राज्यात विशेषतः मराठवाड्यात मराठा-कुणबी जातप्रमाणपत्र वाटपावरून मराठा आंदोलकांकडून रोष व्यक्त होत असतानाच आता याबाबत वेगळीच माहिती समोर आली आहे. ‘सकाळ’ला उपलब्ध झालेल्या माहितीनुसार १९८६ पासून सप्टेंबर- २०२३ पर्यंत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये केवळ १४२ ‘मराठा - कुणबी’ जात प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याची माहिती समोर आली आहे.

मराठवाडा वगळता राज्यात इतरत्र १९८६ पासून ३८ लाखांच्या आसपास ‘मराठा - कुणबी’ जात प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याचे दिसून आले. मराठवाड्यातील बीडमध्ये ९९ आणि जालन्यात ४२ ‘मराठा-कुणबी’ जात प्रमाणपत्र दिली गेल्याची माहिती समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगर, धारशिव, हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूरमध्ये एकही मराठा- कुणबी जात प्रमाणपत्र सप्टेंबर-२०२३ पर्यंत देण्यात आलेले नाही, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन मराठा- कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्या.संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. आताही मराठवाड्यातील १४२ कुणबी जात प्रमाणपत्र नोंदींचा आकडा हा खूपच कमी असल्याने याबाबत माहिती घेण्याच्या सूचना संबंधित जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

विदर्भाला मोठा लाभ

राज्यात मराठवाडा वगळता इतर कोणत्याही भागातील जिल्ह्यात नोंदी न सापडल्याची तक्रार नव्हती. राज्यात १९८६ पासून सप्टेंबर २०२३ पर्यंत ३८ लाखांच्या आसपास मराठा कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. त्यापैकी सर्वाधिक कुणबी प्रमाणपत्रे ही विदर्भातील मराठा समाजाला देण्यात आली आहेत.

म्हणून प्रमाणपत्र नाही

मराठवाड्यात मराठा-कुणबी नोंदी शोधल्या जात नाहीत त्यामुळे आठही जिल्ह्यांमध्ये मराठा - कुणबी जात प्रमाणपत्र मिळत नसल्याची तक्रार मराठवाड्यातील मराठा समाजाची होती. त्यामुळेच नोंदी शोधण्याचे काम हाती घेण्यात आले. राज्य सरकारने स्थापन केलेल्या माजी न्या. संदीप शिंदे समितीने मराठा आंदोलकांची जी तक्रार आहे त्यात कितपत तथ्य आहे याचा आढावा अलीकडे घेतला आहे.

त्यामध्ये सर्व जिल्ह्यांमधून मराठा - कुणबी जात प्रमाणपत्रांचे किती वाटप झाले? याची आकडेवारी सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार मराठवाड्यात केवळ १४२ मराठा - कुणबी जात प्रमाणपत्रे दिली गेल्याचे समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Circuit Bench : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी 75 एकर जागेचा मार्ग मोकळा! निवृत्त सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत कार्यक्रम; 16 ऑगस्टला होणार मोठी घोषणा?

लावणीच्या नावावर अश्लीलतेला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी घ्यावं लागेल प्रमाणपत्र, त्यानंतरच परवानगी; सरकारचा मोठा निर्णय

कार उलटल्यानंतर ट्रकला धडकली, चौघांचा जागीच मृत्यू; देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, ५ जण गंभीर

Shravan Belpatra Rules: बेलाचं पान कधी तोडावं? कधी तोडू नये? 'या' चुकांमुळे लागू शकतो दोष; जाणून घ्या योग्य नियम

Independence Day Live Update : बावनकुळेंचे स्वातंत्र्यदिनी विकसित महाराष्ट्राचे आवाहन

SCROLL FOR NEXT