Maratha Reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : बीडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण; नेत्यांची घरे, कार्यालये पेटवली

सकाळ वृत्तसेवा

बीड : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ जिल्ह्यात सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. मागील दोन दिवस तोडफोडीनंतर सोमवारी (ता. ३०) अगोदर शासकीय कार्यालये बंद केल्यानंतर आंदोलकांनी शहराला टार्गेट केले. शहरातील बाजरापेठे बंद करुन जागोजागी टायर जाळले. सायंकाळ नंतर नेत्यांची घरे व कार्यालयांना आग लावण्यात आल्या.

यात प्रामुख्याने माजी मंत्री व आमदार संदीप क्षीरसागर यांचे नगर रोडवरील बंगलाही जाळण्यात आला. तसेच, आमदार प्रकाश सोळंके यांचे बंधू सुंदरराव सोळंके यांचा बंगला आंदोलकांनी जाळला. समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष सुभाष राऊत यांचे जालना रोडवरील सनराईज हॉटेल आंदोलकांनी जाळले.

नेहमीप्रमाणे शहरात साखळी उपोषण सुरु होते. आंदेालकांनी दुपारी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मुख्य प्रशासकीय इमारत, जिल्हा आरोग्य अधिकारी, दुय्यम निबंधक आदी कार्यालये बंद केली.

आंदोलकांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून नंतर कार्यालयांना टाळे ठोकण्यात आले. यानंतर आंदोलकांनी सुभाष रोडवर जाऊन या ठिकाणी असलेले बॅरीकेट रस्त्यावर आडवे टाकून बाजारपेठ बंद केली. दगडफेकीमुळे शहरात तणाव निर्माण झाला आणि बाजारपेठ बंद झाली. यानंतर आंदोलकांनी यापूर्वी समाजाबद्दल टिपण्णी करणाऱ्या व्यापाऱ्याच्या सोन्याच्या दुकानावर दगडफेक केली. यानंतर समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष सुभाष राऊत यांचे जालना रोडवरील सनराईज हॉटेलला आग लावली. शहरातही संपूर्ण चौक आणि रस्त्यांवर टायर जाळण्यात आले. तसेच शहरात ग्रामीण भागातूनन येणाऱ्या रस्त्यांवर बाभळीचे झुडपे टाकून रस्ते अडविण्यात आले. यानंतर बार्शी रोडवरील राष्ट्रवादी भवन (शरद पवार गट) देखील पेटवून देण्यात आले.

रात्री साडेसहा वाजेच्या दरम्यान, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्याला आग लावली. आगीत बंगल्यातील वाहनेही जळून खाक झाली. आतल्या भागातही मोठे नुकसान झाले. आमदार प्रकाश सोळंके यांचे बंधू धैर्यशिल सोळंके यांचा शहरातील बंगलाही जाळून टाकण्यात आला. तसेच, शिवसेनेच्या (शिंदे) जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे व जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या कार्यालयावरही दगडफेक करण्यात आली.

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे कार्यालय तसेच त्यांच्या घरावरही दगडफेकीची घटना घडली. माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या सुभाष रोडवरील शिवछत्र निवासस्थानावरही आंदोलकांनी दगडफेक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर अपघात, फॉर्च्युनरचा चक्काचूर, एकाचा मृत्यू; धडकी भरवणारा व्हिडीओ समोर

Marathi News Live Updates : उद्यापासून दोन दिवस नाशिकला ‘येलो अलर्ट’

Tax Amendment Bill 2026: UPI, NEFT आणि RTGS सह डिजिटल पेमेंट्समध्ये काय बदल होणार? पाहा 10 मोठे अपडेट्स एका क्लिकमध्ये

IND vs SL Warm UP Match: केएल राहुल करतोय टीम इंडियाचे नेतृत्व, मग शुभमन गिलला नेमकं काय झालं? BCCI ने दिली माहिती

BJP Leader Arrest : माजी खासदार डॉ. हिना गावितांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य भोवलं! भाजप नेत्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, मुलगा अन् PA सह चौधरी जाळ्यात

SCROLL FOR NEXT