manoj jarange maratha reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : ''आम्ही चारही बाजूंनी तयारी केलीय, आता...'' मनोज जरांगेंनी सरकारला काय इशारा दिला?

मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २० तारखेच्या मुंबईतल्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करत सरकारला इशारादेखील दिला आहे.

संतोष कानडे

अंतरवाली सराटीः मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २० तारखेच्या मुंबईतल्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करत सरकारला इशारादेखील दिला आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना विनंती आहे की, कुणीही घरी रहायचं नाही. लेकरांना मोठं करण्यासाठीचं हे शेवटचं आंदोलन आहे. कुणाचं वाहन अडवलं जाणार नाही, कुणालाही भिण्याची गरज नाही.

मराठा बांधवांनी तालुक्यात, गावात बैठक घ्यायला सुरु करा. आरक्षणाचा लढा जिंकण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. सगळ्या ताकदीनीशी मराठा तयार आहे. सरकार मराठ्यांना मुंबईत जाण्यापासून रोखणार नाही. सरकारने आंतरवालीचा प्रयोग पुन्हा करण्याचं स्वप्न बघू नये. मराठे शांततेत येत आहेत, त्यांना शांततेत आंदोलन करु द्या.

जरांगेंनी इशारा दिला की, सरकारने जरी आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही चारही बाजूने तयारी केली आहे. त्यांनाही मुंबईत घुसल्यावर कळेल, आमची तयारी कशी आहे ती. सुरुवातीला कमी लोक दिसतील. नंतर मात्र कोट्यवधी लोक मुंबईत असतील.

''मराठा समाज ओबीसींमध्ये असतानाही आरक्षण दिलं जात नाहीये. कायद्याच्या चौकटीत असणारे सगळे निकष पार केले असले तरी आम्हाला आरक्षणापासून दूर ठेवलं जात आहे, हे चुकीचं आहे. त्यांनी जर आम्हाला डिझेल घेऊ दिलं नाही, गॅस घेऊ दिला नाही तर आम्हीही त्यांचं दूध, भाजी बंद करणार आहोत.. भविष्यात दाळी, धान्य सगळं बंद करणार आहोत. आम्ही डिझेलविना गाड्या चालवू आणि गॅसविना लाकडं पेटवू'' असं जरांगे म्हणाले.

ते पुढे बोलले की, सरकारने मराठा समाजाचं आरक्षण आंदोलन गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारण याचे दूरगामी परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत. मुळात त्यापूर्वीच सरकारने आरक्षणाचा निर्णय घेणं गरजेचं आहे. सरकारने कसलाही दगाफटका करण्याचा विचार करु नये, आम्ही सर्व बाजूंनी तयारी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident in Kolhapur : कोल्हापुरात भीषण अपघात भरबाजारात घुसले वडाप, एका महिलेचा मृत्यू, दोन महिला गंभीर

Abhishek Sharma New Car : अभिषेक शर्माने घेतली नवी 'Ferrari Purosangue', किंमत अन् फिचर्स ऐकून डोळे पांढरे होतील...

Latest Marathi News Live Update : पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडेला जामीन

पुण्यात PMPL बसची दुचाकीला मागून धडक, तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू

US Visa Policy: गोंधळ ओसरला, मात्र धाकधूक कायम! अमेरिकेच्या ‘एच-वन-बी व्हिसा’बाबत आयटीयन्सची परिस्थिती

SCROLL FOR NEXT