Chhatrapati Sambhajiraje Maratha Reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : गरीब मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे - छत्रपती संभाजीराजे

राज्यातील गरीब मराठा समाजाला कायदेशीर टिकणारे आरक्षण मिळावे, अशी मागणी स्वराज्य संघटनेचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्याकडे केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यातील गरीब मराठा समाजाला कायदेशीर टिकणारे आरक्षण मिळावे, अशी मागणी स्वराज्य संघटनेचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे यांनी शनिवारी (ता. १८) राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्याकडे केली.

या मागणीसाठी आणि मराठा समाजाने आरक्षणाबाबत उपस्थित केलेले प्रश्‍न आयोगाकडे सादर करण्यासाठी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार छत्रपती संभाजीराजे यांनी न्या. निरगुडे यांची भेट घेत, त्यांच्याशी आणि राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्व सदस्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत स्वराज्य संघटनेचे रघुनाथ चित्रे पाटील, अंकुश कदम, विनोद साबळे, अप्पासाहेब कुडेकर, धनंजय जाधव आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीनंतर संभाजीराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्या. आनंद निरगुडे यांना मी दोन आठवड्यांपूर्वी पत्र दिले होते. या पत्रात त्यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. सध्या पुण्यात राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक चालू आहे. त्यामुळे त्यांनी मला माझ्या पत्रातील मागणीनुसार आज वेळ दिली होती.

या भेटीत मी त्यांना राज्यातील मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाबाबत उपस्थित कऱण्यात आलेले बारा ते तेरा प्रश्‍न विचारले आणि त्यांना या प्रश्‍नांची यादी दिली. त्यांनी आमचे सर्व प्रश्‍न ऐकून घेतले. मात्र त्यावर त्यांनी काहीही मत व्यक्त केले नाही.’

राज्यातील सध्याच्या सामाजिक घडामोडी पाहता, गरीब मराठा समाजाला कायदेशीर टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व समाजांमध्ये एकोपा राहावा आणि राज्यातील सामाजिक वातावरण बिघडू नये, यासाठीसुद्धा प्रयत्न करणार आहे. मागील काळात छगन भुजबळ हे फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे वारस असल्याचे मत मी व्यक्त केले होते.

परंतु छगन भुजबळ यांनी कालच्या ओबीसीच्या समाजाच्या मेळाव्यात केलेल्या वक्तव्यातून त्यांची जातीयवादी भूमिका स्पष्ट झाली आहे. त्यांच्या या वक्तव्याबद्दल मला पश्चात्ताप होत आहे, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

SCROLL FOR NEXT