महाराष्ट्र

"मराठीच्या भल्यासाठी' व्यासपीठाच्या सदस्यांमध्ये धुसफूस 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई -  मराठी शिक्षण कायदा, मराठी भाषा भवनाची उभारणी आदी मागण्यांची पूर्तता करण्यासंदर्भात निर्माण करण्यात आलेल्या "मराठीच्या भल्यासाठी' या व्यासपीठाच्या सुकाणू समितीवरील नियुक्‍त्यांवरून वाद निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या सुकाणू समितीमध्ये मराठीच्या आंदोलनाशी संबंधित नसलेल्यांची नावे समाविष्ट करण्यात आल्यामुळे काही संबंधित संस्था नाराज असल्याची चर्चा आहे. 

"मराठीच्या भल्यासाठी' या व्यासपीठातर्फे गेल्या 24 जून रोजी आझाद मैदानात मान्यवर साहित्यिक आणि मराठीप्रेमींनी धरणे आंदोलन केले होते. त्या वेळी राज्य सरकारसमोर सहा मागण्या ठेवण्यात आल्या होत्या आणि त्यांच्या पूर्ततेसाठी समिती नेमण्यात यावी, असे पत्र 28 जून रोजी सरकारला देण्यात आले होते. त्यानुसार ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती नेमण्यात आली आहे. कर्णिक यांनी या समितीसाठी इतर सदस्यांची नावे सुचवली असून या सदस्यांत लक्ष्मीकांत देशमुख, रेणू दांडेकर, रंगनाथ पठारे, डॉ. दादा गोरे, कौतिकराव ठाले-पाटील, डॉ. रमेश पानसे, सरकारी अधिकारी वंदना कृष्णा, भूषण गगराणी आदींचा समावेश आहे, अशी माहिती नाव गोपननीय ठेवण्याच्या अटीवर व्यासपीठाच्या एका सदस्याने दिली. 

मात्र समितीमधील काही सदस्यांच्या नावावरून व्यासपीठाच्या सदस्यांत नाराजी निर्माण झाली आहे. ज्यांचा या आंदोलनात सहभागच नव्हता अशांना समितीमध्ये का समाविष्ट करण्यात आले, अशी धुसफूस सुरू झाली असल्याचे सांगण्यात येते; मात्र सध्या तरी हे सारे कुजबुजत्या सुरातच सुरू आहे. मात्र मराठी माणसांच्या सवयीनुसार यातून वादाचा कलगीतुरा होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, अशी उपहासात्मक टिपण्णी एका सदस्याने केली. 

दरम्यान, येत्या काही दिवसांतच ही समिती आणि शिक्षण मंत्री आशीष शेलार यांची या मागण्यांवर विचारविनिमय करण्यासाठी चर्चा होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT