महाराष्ट्र

आताचे सत्ताधीश देशात हुकूमशाही आणतील - अण्णा हजारे

सकाळवृत्तसेवा

राळेगणसिद्धी  - ""गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात वाढला असून, सत्तेसाठी प्रत्येक पक्ष कोणत्याही थराला जात आहे. सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता, अशी स्पर्धा सुरू आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष आणि लोकपाल व लोकायुक्त कायदा कमकुवत करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने जनतेला धोका दिला आहे. आताचे सत्ताधीश देशात हुकूमशाही आणतील,'' अशी भीती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. देशासाठी समान विचारधारेच्या लोकांना एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 

हजारे यांनी पत्रकात म्हटले आहे, की सरकारी तिजोरीची राजरोस लूट सुरू आहे. गरीब-श्रीमंतांमधील दरी वाढत आहे. सत्ता आणि पैशाच्या नशेत राजकारणी आंधळे झाले आहेत. यातून देश विनाशाच्या जवळ जात आहे. याचा परिणाम गरीब लोकांवर होणार आहे. त्यामुळे ज्या भारतीयांना हा देश आपला आहे असे वाटते, त्यांनी दिवसातील एक किंवा दोन तास देशासाठी द्यावेत. अशा लोकांनी संघटित होणे गरजेचे आहे. आपण आता देश वाचविण्याचा प्रयत्न केला नाही, तर इंग्रज भारतात परत येणार नाहीत; पण आताचे सत्ताधीश देशात हुकूमशाही आणतील. 

देशात अनेक समस्या आहेत. त्या सगळ्या एकाच वेळी सुटणार नाहीत; मात्र समान विचारसरणी असणारे लोक निष्काम भावनेने एकत्र आल्यास हळूहळू देशाच्या समस्या सुटतील. जो देशाचा व समाजाचा विचार करतो, ज्याचे जीवन व चारित्र्य शुद्ध आहे, देशासाठी त्यागाची तयारी आहे, अशा लोकांनी एकत्र येऊन संघटन करावे व 23 मार्च रोजी दिल्लीत होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन हजारे यांनी पत्रकात केले आहे. 

"मी आतापर्यंत 22 राज्यांमध्ये जनजागृती सभा घेतल्या. तेथे खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कार्यकर्त्यांचे चांगले संघटन झाले व जनतेचा सरकारवर दबाव निर्माण झाला, तर सर्व प्रश्न सुटण्यास मदत होईल. यासाठी कार्यकर्त्यांनी आपले प्रतिज्ञापत्र द्यावे, म्हणजे त्यांच्यावर राज्याची, जिल्ह्याची किंवा तालुक्‍याची जबाबदारी देता येईल,' असेही त्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT