Minister Dhananjay Munde 
महाराष्ट्र बातम्या

भाजपा शेतकरी नष्ट करण्याचे काम करतेय-मंत्री धनंजय मुंडे

केंद्र सरकार लोकांना कोरोनाची मोफत लस देत असल्याचा केवळ भास दाखवित आहे.

भूषण श्रीखंडे

साक्रीः सात वर्षापासून देशात व मागच्या पाच वर्षात राज्यात जो सत्तेत होता तो भारतीय जनता पक्षाने (BJP) शेतकरी शेतकऱ्यांवर (Farmers) अवलंबून असणाऱ्या प्रत्येक जातीला समूळ नष्ट करण्याच काम करत आहे, असे आरोप सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेनी (Social Justice Minister Dhananjay Munde) आज केले.

धुळे जिल्ह्यातील साक्री येथील बाजार समिती आवारात आयोजित धनगर, ठेलारी समाज मेळाव्याप्रसंगी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित होते. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडले, पुढे बोलतांना म्हणाले की, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांच्या सांगण्यानुसार लसीचा जो काही खर्च येतोय यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. म्हणजे या किंमती वाढवून लसीचा खर्च वसूल केला जातोय. एकीकडे मोफत लस दिली अशी जाहिरातबाजी होतेय पण 100 रुपयापेक्षा जास्त किंमतीत पेट्रोल-डिझेल भरणाऱ्याना ती कितीला पडतेय याचा देखील हिशोब करावा. केंद्र सरकार लोकांना कोरोनाची मोफत लस देत असल्याचा केवळ भास दाखवित आहे हे यातून सिद्ध होत असल्याचे टीकास्त्र मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी सोडले.

तत्कालीन मुंख्यमंत्र्यानी काय दिले..

तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी काय दिले..? त्यांनी बहुजन कल्याण विभाग व सामाजिक न्याय विभागातूनच बाजूला केले. त्यामुळे मला तुम्हाला न्याय देण्यासाठी मंत्री म्हणून जे पणाला लावता येईल ते लावेल; असे आश्वासन मंत्री मुंडे यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT