Maharashtra Mantralay
Maharashtra Mantralay 
महाराष्ट्र

व्ही. के. गौतम यांची पुन्हा बदली 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : शेतकरी कर्जमाफीवरून आयटी विभाग टीकेचा धनी ठरल्याने या विभागाचे सचिव व्ही. के. गौतम यांची बदली वित्त विभागात करण्यात आली होती. त्यास काही महिन्यांचा अवधी लोटत नाही तोच गौतम यांची पुन्हा बदली करत त्यांची नियुक्ती पर्यटन व सांस्कृतिक खात्याच्या प्रधान सचिवपदी राज्य सरकारने केली आहे.

गौतम यांच्यासह 12 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारने आज केल्या. 
पी. एन. भापकर यांची औरंगाबादच्या विभागीय आयुक्त पदावरून पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय के. एच. कुलकर्णी यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून आदिवासी विभागाच्या संशोधन व प्रशिक्षण विभागाच्या आयुक्तपदी करण्यात आली.

नुकतेच महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागात सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेले सनदी अधिकारी माणिक गुरसाळ यांची तेथून शैक्षणिक शुल्क प्राधिकरणाच्या सचिवपदी बदली करण्यात आली. 

ए. ए. गुल्हाने यांची औद्योगिक विकास महामंडळावरून बदली करत वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. श्रीमती के. मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली; तर नीमा अरोरा यांची नंदुरबार येथील आयटीडीपी प्रकल्प अधिकारीपदावरून जालन्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली.

बी. पी. पृथ्वीराज यांचीही भंडारा येथील आयटीडीपी प्रकल्प अधिकारीपदावरून परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. अमोल येडगे यांचीही नाशिकच्या आयटीडीपी प्रकल्प अधिकारीपदावरून बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली. याशिवाय मनीषा खत्री यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. सचिन ओंबासे यांना आहेरीतून गडचिरोलीच्या आयटीडीपी प्रकल्प अधिकारीपदावर नियुक्त करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT