solapur APMC election solapur sakal
महाराष्ट्र बातम्या

बाजार समिती निवडणूक! हरकतींवरील सुनावणी पूर्ण, आज अंतिम यादी जाहीर होणार; माजी आमदार दिलीप माने, माजी उपसभापती सुरेश हसापूरे यांचे अर्ज वैध?

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल ३८८ उमेदवारांचे ४३८ अर्ज छाननीत वैध ठरले. तर ४१ अर्ज अवैध ठरले. माजी सभापती दिलीप माने, माजी उपसभापती सुरेश हसापूरे यांच्या अर्जाला घेतलेल्या हरकतीवरील सुनावणी पूर्ण झाली असून बुधवारी (ता. २) उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल ३८८ उमेदवारांचे ४३८ अर्ज छाननीत वैध ठरले. तर ४१ अर्ज अवैध ठरले. माजी सभापती दिलीप माने, माजी उपसभापती सुरेश हसापूरे यांच्या अर्जाला घेतलेल्या हरकतीवरील सुनावणी पूर्ण झाली असून बुधवारी (ता. २) उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे.

बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ४७९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्या अर्जांची मंगळवारी (ता. १) हैदराबाद रस्त्यावरील बाजार समितीच्या सहकार महर्षी वि. गु. शिवदारे सभागृहात छाननी झाली. निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, सहाय्यक उपनिबंधक आबासाहेब गावडे, गजानन वडेकर, उमेश पवार, बाजार समितीचे सचिव दत्तात्रय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत अर्जांची छाननी झाली. यासाठी उमेदवारांसह राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. छाननीवेळी माजी सभापती दिलीप माने, माजी उपसभापती सुरेश हसापुरे यांच्या अर्जांवर पिरप्पा घंटे यांनी हरकत घेतली. ते सोसायटीचे थकबाकीदार असतानाही त्यांचा मतदार यादीत समावेश केला आहे.

त्यामुळे सहकार अधिनियम १९६० च्या कलम ७३ सी ए नुसार त्यांचे अर्ज अवैध ठरविण्याची त्यांची मागणी होती. तसेच थकबाकीदार नसल्याचा दाखला न जोडणे, सातबारा न जोडणे, नियमानुसार क्षेत्र नसणे आदी कारणांमुळे अर्ज ४१ अर्ज अवैध ठरले. माने, हसापुरे यांच्यासह अन्य उमेदवारांच्या हरकतींवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सुनावणी पूर्ण झाली. दोन्ही बाजुच्या वकिलांनी कायद्याचा कीस पाडला. त्या हरकतींवरील निकाल राखून ठेवला असून बुधवारी निकालासह अंतिम उमेदवारी यादी जाहीर केली जाणार आहे.

माने, हसापुरेंच्या अर्जावर अशी होती हरकत

माजी सभापती माने, माजी उपसभापती हसापुरे हे विविध कार्यकारी विकास सोसायटीचे थकबाकीदार असल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्याची घंटे यांची मागणी होती. त्यांनी प्रत्यक्ष युक्तिवाद करताना जिल्हा बँकेच्या सहकार अधिनियम कलम ८८ नुसारच्या चौकशीत माने यांच्यावर जबाबदारी निश्‍चित केल्याचेही म्हटले. मात्र, माने यांच्या वकिलांनी सहकार अधिनियम १९६० व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती हे दोन्ही कायदे वेगवेगळे असल्याचा युक्तिवाद केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway : पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी! नांदेड आणि हरंगुळ एक्स्प्रेस गाड्या २६ जानेवारीपासून हडपसरवरून सुटणार, पहा नवीन वेळापत्रक

IPL 2026: राजस्थान रॉयल्सला मिळाली द्रविडची रिप्लेसमेंट! जडेजाला संघात घेतल्यानंतर जाहीर केला मोठा निर्णय

Latest Marathi Breaking News : बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित

Mumbai Crime: अंधेरीत विद्यार्थ्याला श्वानासोबत संबंध ठेवायला भाग पाडलं, ब्लॅकमेल करत बळजबरीनं लिंगबदल करायला लावलं; तृतीयपंथीयांकडून अत्याचार

Pune Cyber Fraud : पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; पार्टटाइम जॉब आणि शेअर ट्रेडिंगच्या नावाने ९८ लाखांची फसवणूक

SCROLL FOR NEXT