Manoj Jarange sakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : उमेदवारीसाठी जुळवाजुळव सुरू करा ,जरांगे ; चर्चेअंती २९ ऑगस्टला अंतिम निर्णय घेणार

विधानसभेची आगामी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करून ठेवावी.

सकाळ वृत्तसेवा

वडीगोद्री (जि. जालना) : विधानसभेची आगामी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करून ठेवावी. उमेदवारी द्यायचे किंवा कसे यावर २९ ऑगस्टला निर्णय होणार आहे. त्यामुळे धावपळ नको म्हणून संबंधितांनी तयारीला लागावे. सर्वांसमक्ष चर्चा करून उमेदवार ठरवू. त्यासाठी १४ ते २० ऑगस्टदरम्यान प्रस्ताव दाखल करावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी आज समाजबांधवांना केले.

अंतरवाली सराटी (ता. अबड) येथे आज माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘‘आरक्षणासंबंधी मागण्यांवर निर्णयासाठी शासनाला १३ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. सरकारने आरक्षण द्यावे, मागण्या मंजूर कराव्यात. आरक्षणाच्या आडून राजकारण करायचे नाही. ॲड. प्रकाश आंबेडकर काय म्हणतात तो त्यांचा प्रश्न आहे. मी व समाजाने त्यांचा नेहमी आदर केला आहे. मी आरक्षणावर ठाम आहे. धनगर व मराठा समाजाचे प्रश्न सारखेच आहेत. खचून न जाता ताकदीने उभे राहीले पाहिजे. धनगर समाजालाही ‘एसटी’मध्ये आरक्षण नक्की मिळणार आहे. त्यासाठी सरकारने न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडली होती का हे पाहणे गरजेचे आहे. आरक्षणाची आशा सोडली नाही. आरक्षण आंदोलन व निवडणुकीबाबतच विचार सुरूच आहे. वर्षापासून आरक्षण लढा सुरू आहे, ही सोपी गोष्ट नाही,’’ असेही ते म्हणाले.

‘‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आमदार प्रवीण दरेकर माझ्या बदनामीसाठी अभियानात राबवीत आहेत. कितीही बदनामी केली तरी मागे हटणार नाही आणि त्यांचे अभियानात यशस्वी होणार नाही,’’ असेही जरांगे म्हणाले.

राणेंच्या धमकीला घाबरत नाही

‘‘खासदार नारायण राणे यांना मराठवाड्यात यायचे नाही, असे मी म्हटले नाही. त्यांचा नेहमी आदर केला आहे. तरीही ‘मी मराठवाड्यात येणार, जरांगे काय करतो ते बघतो’ तर अशी धमकी ते देत असतील तर त्यांच्या धमकीला घाबरत नाही. मी बोलू लागलो तर त्यांना कोकणातही फिरणे मुश्कील होईल. त्यांचा मुलगा, आमदार नीलेश राणे यांनी त्यांना समजून सांगावे,’’ असेही जरांगे म्हणाले.

उमेदवार अपक्ष म्हणून लढतील

‘‘आम्ही कोणत्याही पक्षात जाणार नाही, आघाडीत जाणार नाही. निवडणूक लढविण्याची वेळ आली तर आमचे उमेदवार अपक्ष म्हणून पुढे येतील. आम्हाला राजकीय बस्तान बसायचे नाही तर गोरगरीब मराठ्यांना न्याय द्यायचा आहे. आरक्षणासाठी लढायचे आहे, त्यापासून मागे हटणार नाही. निवडणुकीमध्ये मतदारांना त्रास होईल, अन्याय होईल पण तो सहन करा. आपल्या विचाराचे उमेदवार निवडून द्या,’’ असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT