Matheran midi bus google
महाराष्ट्र बातम्या

कर्जत-माथेरान मिडी बस सेवा सुरू; टाळेबंदीनंतर एसटीची पर्यटकांना साद

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : माथेरान नगरपालिकेच्या (Matheran municipal) मागणीवरून सुरू करण्यात आलेली कर्जत ते माथेरान (karjat-matheran) मिडी बस सेवा (Midi Bus) टाळेबंदीमुळे काहीच महिन्यांत बंद पडली. त्यांनतर आता तब्बल दीड वर्षांनंतर माथेरानच्या पर्यटकांसाठी (matheran tourism) आणि स्थानिकांसह शालेय विद्यार्थ्यांसाठी (students) फायद्याची ठरणारी ही मिडी बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. कर्जतहून ही बस सुटून नेरळ रेल्वेस्थानकातून माथेरान येथील अमन लॉजपर्यंत धावणार आहे.

सुटीच्या दिवसात पर्यटन करून त्याच दिवशी परतण्याचा प्लॅन असल्यास मुंबईकर नक्कीच माथेरानच्या पर्यटनाचा पर्याय निवडतात. माथेरान-मुंबई, पुण्यातील स्थानिकांमध्ये सर्वात जवळचे सहलीचे ठिकाण आहे. साधारण २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले असून संपूर्ण डोंगरमाथा माथा, जैवविविधता तसेच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. या निसर्गरम्य पर्यटनस्थळी एसटीची कर्जत आणि नेरळ (खांदा) येथून थेट मिडी बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

सध्या माथेरान पर्यटनासाठी जाणाऱ्यांसाठी खासगी प्रवासी वाहतुकीची सेवा नेरळ स्थानकावरून उपलब्ध आहे. नेरळ ते अमन लॉज माथेरानपर्यंत प्रतिप्रवासी १०० रुपये तिकीट घेतले जाते. मात्र, एसटी महामंडळाच्या बसमधून अवघ्या २५ रुपयांमध्ये अमन लॉजपर्यंत पोहोचता येणार आहे. त्यामुळेच स्थानिक आणि पर्यटकांची आर्थिक लूट थांबणार असून, त्यांना दिलासा मिळणार आहे.


बसचे वेळापत्रक

कर्जतहून : ६.००, ८.३०, १२.०५, २.३०, ५.००
माथेरानहून - ७.२५, ९.४५, १.२०, ३.४५, ६.१०

प्रवासी भाडे

कर्जत-माथेरान : ४० रुपये
नेरळ-माथेरान : २५ रुपय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: सून सासरच्यांचा सांभाळ करण्यास बांधील नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, वारसा हक्क आणि पोटगी वेगवेगळे

Pune Rain Update : पुण्यात अवकाळीची एन्ट्री; बाणेरमध्ये गारांचा पाऊस, उकाड्याने हैराण पुणेकरांना दिलासा

"लग्न कधी करणार ?" चाहत्याच्या प्रश्नावर प्राजक्ता माळीचं भन्नाट उत्तर ! "आई-बाबा.."

Latest Marathi News Live Update : कागदपत्रात खोडाखोड करून जमीन खरेदीप्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या मुलीवर गुन्हा दाखल

Redmi 15A स्मार्टफोन झाला लाँच! १३ हजारपेक्षा कमी किंमतीत दमदार बॅटरी; 32MP कॅमेरा अन् खूप काही, पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT