supriya sule ajit pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : अजित पवारांच्या संघटनेत काम करण्याच्या इच्छेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या...

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्षाच्या संघटनेत काम करण्याबाबत व्यक्त केलेल्या इच्छेचा मी आदर करते. अशा निर्णयामुळे संघटनेत एक चांगला संदेश जाण्यास मदत होते. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष एक कुटुंब म्हणून काम करत आहे.

त्यामुळे अजित पवार यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, हे बहिण या नात्याने माझे मत असल्याची भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी (ता.२२) पुण्यात एका कार्यक्रमापूर्वी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या पदावरून मुक्त करावे आणि संघटनेत काम करण्याची संधी मिळावी, अशी इच्छा काल व्यक्त केली होती. पवार यांच्या या इच्छेबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुळे यांनी ही भावना व्यक्त कली. यशवंतराव चव्हाण सेंटरच्यावतीने पुण्यात आयोजित कऱण्यात आलेल्या यशस्विनी सन्मान सोहळ्यासाठी सुळे आज पुण्यात आल्या होत्या. हा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सुळे पुढे म्हणाल्या, ‘‘अजित पवार यांच्या इच्छेचा मला मनापासून आदर आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. अशा निर्णयाचा केडर, संघटनेत देखील चांगला संदेश जात असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक कुटुंब म्हणून काम करतो. संघटनेत आजवर अनेक ज्येष्ट नेत्यांनी प्रदेशाध्यक्षपदावर काम केलेले आहे.

'कोणाला कोणते पद द्यायचे, याबाबतचा निर्णय हा संघटनात्मक पातळीवर घेतला जातो. सेवा, सन्मान आणि स्वाभिमान ही राष्ट्रवादीची पुढची दिशा असेल.’’ सुळे यांनी यावेळी महिला सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT