MD Drugs esakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापुरात पुन्हा सापडले एमडी ड्रग्ज! मुंबईतून एकजण सोलापुरात आला अन्‌ ९५० ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज देऊन गेला, पोलिसांचे पथक मुंबईला रवाना, वाचा...

मुंबईतून ९५० ग्रॅम ड्रग्ज घेऊन एक तरुण सोलापूर शहरात आला. त्याने सोलापुरातील रिजवान सिकंदर खान (रा. अंबिका नगर भाग-३, नई जिंदगी) व साहील सिकंदर पिरजादे (रा. अल्तमश अपार्टमेंट, मंत्रीचंडक नगर, सोलापूर) यांच्याकडे ते ड्रग्ज दिले आणि तो मुंबईला परतला, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : मुंबईतून ९५० ग्रॅम ड्रग्ज घेऊन एक तरुण सोलापूर शहरात आला. त्याने सोलापुरातील रिजवान सिकंदर खान (रा. अंबिका नगर भाग-३, नई जिंदगी) व साहील सिकंदर पिरजादे (रा. अल्तमश अपार्टमेंट, मंत्रीचंडक नगर, सोलापूर) यांच्याकडे ते ड्रग्ज दिले आणि तो मुंबईला परतला, अशी माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी रिजवान व साहील यांना अटक केली आहे. आता शहर गुन्हे शाखेचे पथक त्या तरुणाच्या शोधात उद्या (गुरुवारी) मुंबईला जाणार आहे.

मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास बातमीदाराकडून पोलिस अंमलदार भारत पाटील यांना दोघांकडे ‘एमडी’ ड्रग्ज असल्याची खबर मिळाली. व्हीआयपी रोडवरील मुस्लिम कब्रस्तान ते संगमेश्वर कॉलेज रोडवर एक पांढऱ्या रंगाची कार (एमएच १२, ईएस १४११) उभी होती. चालकाच्या सीटवर रिजवान खान बसलेला होता. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने कारला गराडा घालून त्याला ताब्यात घेतले.

सीटखालील ड्रावरमध्ये एका राखाड्या रंगाच्या पिशवीत मेफेड्रोन ड्रग्ज होते. पोलिसांनी आता रिजवान व साहील या दोघांचे ‘सीडीआर’ मागविला असून त्यातून बरीच माहिती समोर येईल, असा विश्वास पोलिसांना आहे. या गुन्ह्यात देखील मुंबई कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने दोन्ही संशयित आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली असून सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय काळे तपास करीत आहेत.

व्हॉट्‌सॲप, स्नॅपचॅटवरुन एजंटांशी संपर्क

मुंबईतून एमडी ड्रग्ज घेऊन सोलापुरात आलेल्या तरुणाने रिजवान व साहील यांच्याशी व्हॉट्‌सॲप कॉल व स्नॅपचॅटवरुन संपर्क ठेवला होता, अशीही बाब तपासात समोर आली आहे. गुन्ह्यात वापरेली कार फरार संशयित आरोपी अफजल मुर्शद (रा. मुस्लिम कब्रस्तानजवळ, सोलापूर) याच्या नातेवाईकाची असून आता कार मालकाचीही चौकशी होणार आहे. दरम्यान, ‘एमडी’ची पिशवी साहील, अफजल व एका अनोळखी तरुणाने रिजवानकडे दिली होती. यातील साहीलला पोलिसांनी अटक केली असून दुसरे दोघे पोलिसांना अजूनही सापडलेले नाहीत. सर्व संशयित आरोपींविरुद्ध पूर्वीचे कोणतेही गुन्हे दाखल नाहीत. ते पहिल्यांदाच या अवैध धंद्यात पडले असून अफजल व रिजवान चालक म्हणून काम करतात तर साहीलचे वडील रिक्षा चालक असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

‘एमडी’ ड्रग्ज पुरवठ्यात नवनवीन तरुण एजंट

सप्टेंबर महिन्यात एका तरुणाला कर्णिक नगरजवळ पकडले, त्यावेळी त्याच्याकडे २९ ग्रॅम ‘एमडी’ मिळाले होते. एप्रिल महिन्यात जेलरोड पोलिसांनी दोघांना जेरबंद करून ४६ ग्रॅम ‘एमडी’ जप्त केले होते. यापूर्वी देखील सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांनी ‘एमडी’च्या कारवाया केल्या आहेत. आता १२ मे रोजी शहर गुन्हे शाखेने तब्बल ९५० ग्रॅम एमडी ड्रग्ज पकडले. मुंबईतील डिलर एजंटांमार्फत नवनवीन तरुणांच्या मदतीने ‘एमडी’ सोलापुरात आणत आहेत. त्याबदल्यात त्यांना कमिशन व विक्रीतून मोठा पैसा दिला जातो. या गंभीर गुन्ह्यात अजूनही शहर-ग्रामीण पोलिस मुळाशी पोहचू शकलेले नाहीत, हे विशेष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात मेगा ब्लॉक; नागपूर-पुणे मार्गावरील अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

Hadapsar Bomb CCTV footage : हडपसरमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू ठेवणारा सीसीटीव्हीत कैद , 'महत्वाचे धागेदोरे हाती' पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

Virat Kohli Century: IPL मध्ये विराटच शतकांचा 'किंग'! KKR विरुद्ध केलेल्या १०५ धावांनी घडवला इतिहास, पाहा काय केलाय विक्रम

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावी पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; वेळापत्रक जाहीर

Panic Button Rule : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! आता प्रत्येक टॅक्सी, कॅब, बसमध्ये असणार GPS आणि पॅनिक बटण; नसेल तर परवाना होणार रद्द

SCROLL FOR NEXT