Girish-Mahajan
Girish-Mahajan 
महाराष्ट्र

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय - गिरीश महाजन

सकाळन्यूजनेटवर्क

नागपूर - प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारणे ही सरकारची भूमिका आहे. पुढील वर्षीपासून उस्मानाबाद जिल्ह्यासह कोकणात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आज विधान परिषदेत केली. अमरसिंह पंडित यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते.

राज्यात वैद्यकीय प्रवेशासाठी जात आणि प्रवर्ग आरक्षण असतानाही प्रादेशिक आरक्षण लादल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याच्या मुद्द्यावरून मराठवाड्यातले सदस्य आक्रमक झाले होते. यामुळे सभागृहात अभूतपूर्व गदारोळ झाला. प्रादेशिक आरक्षण रद्द करून मराठवाड्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवून त्यांची प्रवेश क्षमता वाढवावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमरसिंह पंडित यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महाजन यांनी हे आरक्षण 1985 पासून लागू आहे, असे सांगत तत्कालीन कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारने मराठवाड्यात एकही सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले नाही, असे सांगितले. यावर विरोधकांनी आक्षेप घेत आणि उत्तरावर असमाधान व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे ही मागणी केली. तोपर्यंत लक्षवेधी सूचना राखून ठेवण्याची विनंती केली. या वेळी विरोधी सदस्यांनी हौद्यात येऊन घोषणा दिल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून वैद्यकीय शिक्षणमंत्रीही हौद्यात आले आणि भाजप सदस्यांनी हौद्यात ठिय्या मांडला.

या वेळी कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची मागणी करण्यात आली. याला उत्तर देताना महाजन यांनी महिनाभरात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन या संदर्भातल्या सगळ्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर या वादावर पडदा पडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT