Chandrakant-Patil 
महाराष्ट्र बातम्या

विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही! - चंद्रकांत पाटील

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - मराठा समाजातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेत आहोत. या मुद्द्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, या विषयावर मार्ग काढण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे परवानगी मागितली आहे. लवकरच त्यावर तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री व मराठा आरक्षण अंमलबजावणी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली. 

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेले; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे प्रवेश रद्द झालेले विद्यार्थी, पालक व मराठा समाजातील नेत्यांशी पाटील यांनी आज चर्चा केली. त्यानंतर ते म्हणाले, ‘‘वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशासंबंधी तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवेश रद्द झालेल्या मराठा समाजातील सर्व विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे.’’

वैद्यकीय पदव्युत्तरच्या जागा वाढवून मिळण्याबाबतही केंद्र सरकारकडे पत्र पाठविण्यात आले आहे. निवडणूक आयोगाची परवानगी आल्यानंतर राज्य सरकार तातडीने कार्यवाही करणार असून, त्यासंबंधीच्या कायदेशीर बाबींची प्रक्रिया सुरू केली आहे. एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी अस्वस्थ होऊ नये, असे आवाहन पाटील यांनी केले.

दरम्यान, नव्याने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी २५ मे अंतिम तारीख असून, ही मुदत ३१ मेपर्यंत वाढवून देण्याची विनंती करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आला आहे. तसेच, वैद्यकीय पदव्युत्तरच्या जागा वाढवून मिळण्यासंबंधीही केंद्र सरकारकडे पत्र पाठविण्यात आल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee TMC Resignation : ममता बॅनर्जींना तगडा झटका; अत्यंत विश्वासू चंद्रिमा भट्टाचार्य यांनी तृणमूल पक्ष प्रमुख पदाचा दिला राजीनामा

Dilip Walse Patil: हपकिनच्या कामकाजाबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, तुकाराम मुंडे यांच्याकडेच पदभार ठेवा: वळसे पाटील यांची विधिमंडळात मागणी

Mumbai News: रेल्वेचे दावे कोरडे, डबे मात्र ओले! लोकलच्या छतातून पाण्याचा वर्षाव; रेल्वे प्रशासनावर टीकेचा भडिमार

आधी गाडण्याची तयारी केली, नंतर पतीची हत्या; ४५ दिवसांनी पत्नीचं कांड समोर

Latest Marathi Live Update: विकेंडला रायगडला जाणार आहात? देवकुंड, ताम्हाणीसह अनेक पर्यटनस्थळांवर लागू झाले कडक निर्बंध

SCROLL FOR NEXT