Mega Recruitment sakal
महाराष्ट्र बातम्या

ZP Mega Recruitment : राज्यातील जिल्हा परिषदेच्या १९ हजार ४६० जागांसाठी मेगाभरतीला सुरवात

राज्यातील जिल्हा परिषदेतील मेगाभरतीला सुरवात झाली आहे. १९ हजार ४६० जागांसाठी भरती प्रक्रिया प्रारंभ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - राज्यातील जिल्हा परिषदेतील मेगाभरतीला सुरवात झाली आहे. १९ हजार ४६० जागांसाठी भरती प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेची भरतीसाठी ५ ऑगस्टपासून अर्ज भरणे सुरू झाले असून १६ संवर्गांतील ४३२ जागा भरण्यात येत आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिली.

राज्यातील ३४ जिल्हा परिषदेमध्ये मेगाभरती होत आहे. ही भरती प्रक्रिया इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन (आयबीपीएस) या संस्थेकडून राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शनिवारी जाहिरात काढण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेसाठी ४३२ जागा सरळसेवा भरतीने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी २५ ऑगस्टपर्यंत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येतील.

दरम्यान, राज्यातील ३४ जिल्हा परिषदेमध्ये एकाच दिवशी परिक्षा होणार आहेत, यामुळे उमेदवारांनी एका पदासाठी अनेक ठिकाणी अर्ज न करता एकाच ठिकाणी अर्ज करावा. तसेच भरतीसाठी दलाल बाहेर फिरत आहेत. नोकरीला लावून देतो, अशा आमिषाला बळी पडू नका. ही प्रक्रिया पारदर्शक होणार आहे.

तर भरती प्रक्रियेच्या माहितीसाठी ‘मदतकक्ष’ स्थापन केला असून ०२४०-२३२९७१४, ९५७९२३४५७८ व ९१७५१८५८५१ या क्रमांकावर उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत संपर्क करावा, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) सुदर्शन तुपे यांनी केले.

असा करा अर्ज

जिल्हा परिषदेतील भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun२३/ या संकेतस्थळावरून अर्ज करावे लागणार आहे. अर्ज करण्यासाठी आधी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. ५ ते २५ ऑगस्टपर्यंत हा अर्ज करता येणार आहे. याच कालवधीत परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

या पदांची होणार भरती

आरोग्य विभागात सर्वाधिक ३१५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. आरोग्य सेवक पुरुष (४० टक्के)- ५. आरोग्य सेवक पुरुष (४० टक्के)- ५७, आरोग्य सेविका- २४४, औषध निर्माण अधिकारी ९ या पदांचा समावेश आहे. कंत्राटी ग्रामसेवक- १५, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- ४१, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)- १८, कनिष्ठ सहाय्यक (लेखा)- ४, पशुधन पर्यवेक्षक- १३, प्रयोगशाळा तंत्रज्ञ- १, लघुलेखक (उच्चश्रेणी)- १, वरिष्ठ सहायक (लिपिक)- १, वरिष्ठ सहाय्यक (लेखा)- १, विस्तार अधिकारी- १, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक- १२, पर्यवेक्षिका- ९ या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT