Mhada  Sakal
महाराष्ट्र बातम्या

MHADA Exam: भरती परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार

आयोजित केलेली परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होईल, असे जाहीर केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवारी (ता.7) राज्यात सुट्टी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर म्हाडा भरती परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी म्हाडाने भरतीअंतर्गत अतांत्रिक पदासाठी सोमवारी (ता.7) आयोजित केलेली परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होईल, असे जाहीर केले आहे. (MHADA Exam Updates)

राज्य सरकारने राज्यात सुट्टी जाहीर करताच सोमवारी (ता.7) परीक्षा देणाऱ्या उमेदवारांकडून परीक्षा होणार की पुढे ढकलण्यात येणार याविषयी फोन करून विचारणा सुरू झाली. उमेदवारांमध्ये परिक्षेबाबत संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी म्हाडाने परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होईल, असे जाहीर केले आहे. म्हाडा सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत अतांत्रिक संवर्गातील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या पदांसाठी नियोजित केलेल्या वेळापत्रकानुसार सोमवारी (ता.7) रोजी सकाळी 9 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत, दुपारी 12.30 वाजेपासून ते 2.30 वाजेपर्यंत तर दुपारी 4 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अशा तीन सत्रांत परीक्षा होणार आहे, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी असे आवाहन म्हाडा प्राधिकरणाचे सचिव राजकुमार सागर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT