Mhada sakal media
महाराष्ट्र बातम्या

नागपूरमध्ये म्हाडातर्फे ५८० घरांची सोडत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोकण मंडळाच्या सोडतीनंतर म्हाडाच्या (mhada) नागपूर मंडळाची (nagpur region) सोडत लवकरच काढण्यात येणार आहे. विमानतळ, मुख्य बाजारपेठ परिसराजवळ असलेल्या या प्रकल्पातील (mhada project) सुमारे ५८० घरांचा सोडतीमध्ये (house lottery) समावेश होणार आहे. यामधील बहुतांश घरे मध्यम उत्पन्न गटातील आहेत.

म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत १४ ऑक्टोबर रोजी ८ हजार ९८४ घरांची सोडत काढण्यात आली. या सोडतीला अर्जदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. या सोडतीनंतर म्हाडाच्या नागपूर मंडळातील ५८० घरांची सोडत काढण्यात येणार आहे. इम्प्रेस मिल, सुभाष रोड येथे ही घरे असून येथे ९ इमारती उभारण्यात आल्या आहेत. यामधील मध्यम उत्पन्न गटातील ७ आणि उच्च उत्पन्न गटातील २ इमारती आहेत.

यापैकी ६ इमारतींचे काम डिसेंबरमध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली. त्यामुळे या घरांच्या किमती निश्चित करण्यात येत आहेत. किमती निश्चित झाल्यानंतर या घरांची सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, असे नागपूर मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT