Earthquake Esakal
महाराष्ट्र बातम्या

Earthquake In Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के; जीवितहानी नाही

कोल्हापूर जिल्ह्यासह आज सांगली आणि सातारा जिल्ह्यात आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले

अंकिता खाणे (Ankita Khane)

Kolhapur News : कोल्हापूरमध्ये आज 3.4 रिश्टल स्केलचा भूकंप जाणवला आहे. हे भूकंपाचे धक्के सकाळी 6.45 च्या सुमारास जाणवले आहेत. भूकंपाचे केंद्रस्थळ 5 किमी खोल असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली असल्याची माहिती समोर आलेली नाही.

कोल्हापूर जिल्ह्यासह आज सांगली आणि सातारा जिल्ह्यात आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किमी खाली होता.

कोल्हापूरपासून 76 किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. आज (16 ऑगस्ट) सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

सातारा जिल्ह्यातील पाटण शहरासह जवळच्या गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पहाटे 6.40 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला आहे. सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्णाण झाले होते.

कोयना धरणापासून 20 किलोमीटर अंतरावर हे भूकंप धक्के जाणवले असून धरण सुरक्षित आहे. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर कोल्हापूर, सांगली, सातारासह सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्य परिसरापासून 15 किमी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: सिंहगड ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT