AKLUJ MILK POWDER

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

दूध भेसळीच्या रॅकेटचे अकलूज कनेक्शन! अकलूजच्या हेमंत टेके याच्या गोदामातील दीड कोटी रुपयांची दूधपावडर जप्त; पिलीवमध्ये ७००० लिटर दूध नष्ट, वाचा...

दूध भेसळीच्या रॅकेटमध्ये अकलूजच्या हेमंत कार्पोरेशनचा मालक हेमंत टेके याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अकलूज येथील गोदामातील तब्बल ९६ हजार ७८० किलो पावडर (किंमत एक कोटी ३४ लाख ४६ हजार ८१ रुपये) भेसळीच्या संशयातून जप्त करण्यात आली आहे. तर पिलीव येथील सोनू ऊर्फ चैतन्य घोरपडे याच्याकडेही ५१ किलो दूधपावडर आढळली. या पावडरचे एकूण ११ नमुने अन्न व औषध प्रशासनाने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : दूध भेसळीच्या रॅकेटमध्ये अकलूजच्या हेमंत कार्पोरेशनचा मालक हेमंत टेके याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अकलूज येथील गोदामातील तब्बल ९६ हजार ७८० किलो पावडर (किंमत एक कोटी ३४ लाख ४६ हजार ८१ रुपये) भेसळीच्या संशयातून जप्त करण्यात आली आहे. तर पिलीव येथील सोनू ऊर्फ चैतन्य घोरपडे याच्याकडेही ५१ किलो दूधपावडर आढळली. या पावडरचे एकूण ११ नमुने अन्न व औषध प्रशासनाने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

हेमंत टेके व सोनू घोरपडे यांच्याकडील जप्त केलेली दूधपावडर भेसळयुक्त होती का, याचे उत्तर प्रयोगशाळेच्या अहवालानंतर मिळणार आहे. तुर्तास, हेमंत टेके हा पावडर विक्रीचा मोठा डिलर असून, अनेक वर्षांपासून या व्यवसायात आहे. त्याच्याकडे पावडर विक्रीचा परवाना असल्याचेही अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

दरम्यान, टेके याचे अकलूजजवळील माळेवाडी येथे गोदाम होते. मात्र, त्याने काही दिवसांपूर्वी ते गोदाम बंद केले होते. सध्या त्याचे गोदाम अकलूजमधील नामदेव मंगल कार्यालयामागे आहे. त्या गोदामात १० प्रकारच्या पावडरचा साठा होता. बॉडी बिल्डिंग, प्रोटीन वाढविण्यासाठी तसेच दुधातील ‘एसएनएफ’ वाढविण्यासाठी त्या दूधपावडरचा वापर केला जात होता, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

दूध भेसळीसाठी पावडरचा वापर?

राज्यातील दूध भेसळीच्या रॅकेटमध्ये माळशिरस तालुक्यातील अकलूजचा हेमंत टेके व पिलीवचा सोनू घोरपडे यांची नावे समोर आली असून, मंचर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. टेकेच्या गोदामातील पावडर भेसळयुक्त आहे का, याचा तपास सुरू आहे. त्याच्याकडील पावडर दूध भेसळीसाठी वापरली जात होती, असा संशय पोलिसांना आहे. ठाण्यातील एकजण दूध भेसळीसाठी केमिकल पुरवत होता, तर अकलूजचा टेके पावडर पुरवठादार होता, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी माध्यमांना दिली आहे. विशेष म्हणजे, या कारवाईबद्दल सोलापूरच्या अधिकाऱ्यांना काहीच माहिती नाही. सोलापूरच्या अधिकाऱ्यांनी केवळ टेकेचे गोदाम सील करून पावडर भेसळीच्या संशयातून जप्त केली आहे.

पिलीवमध्ये सात हजार लिटर दूध नष्ट

पुणे जिल्ह्यातील मंचर येथील दूध भेसळ प्रकरणाच्या पुढील तपासाचा भाग म्हणून सोलापूरच्या अन्न व औषध प्रशासनाने पिलीव (ता. माळशिरस) येथील महालक्ष्मी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सवर धाड टाकली. येथील ३ लाख ५ हजार ३६० रुपये किमतीचे गाईचे ७ हजार ६३४ लिटर दूध जागेवर नष्ट करण्यात आले. हे दूध दर्जाहीन व भेसळयुक्त असण्याची शक्यता असल्याने ते नष्ट करण्यात आले आहे. तसेच दर्जाहीन दूध स्वीकारल्याचे आणि त्याबाबतचे कागदोपत्री पुरावेही आढळून आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने गेल्या दीड महिन्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांवरील कारवाई अधिक तीव्र केली आहे. या कारवाईत दुधाचे ४०, तर दुग्धजन्य पदार्थांचे ३४, असे एकूण ७४ नमुने घेण्यात आले आहेत. हे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्यांचा अहवाल आल्यानंतर दोषी नमुन्यांच्या प्रकरणात संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT