महाराष्ट्र

कोट्यवधींची बनावट कीटकनाशके जप्त 

सकाळवृत्तसेवा

यवतमाळ/कळंब : गेल्या वर्षी कीटकनाशकांच्या फवारणीने विदर्भातील 52 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. यामागील प्रमुख कारण बनावट कीटकनाशकांचा वापर होते. त्यामुळे बनावट कीटकनाशके शोधणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. यावर्षी कृषी विभाग व पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत कळंब येथे दोन दिवसांत तीन छापे टाकून कोट्यवधींचे बनावट कीटकनाशके व साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे राज्यातील इतरही जिल्ह्यांत बनावट कीटकनाशके विकली जात असण्याला पुष्टी मिळाली आहे. 

बनावट कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकऱ्यांना विषबाधा होत असल्याचे शेतकरी सांगत होते; परंतु ही बाब फारशी कुणी गांभीर्याने घेतली नाही. "सकाळ'ने "फवारणीचा फास'मधून बोगस कीटनाशकांमुळे विषबाधा होत असल्याचा मुद्दा सातत्याने सांगितले. अखेर बनावट कीटकनाशके तयार करण्यात येणाऱ्या गोडाऊनवरचा छापा यशस्वी झाला. कृषी व पोलिस विभागाने गुरुवारी (ता. 13) रात्री साडेदहादरम्यान कळंब येथील जय गुरुदेव कृषी केंद्र व गुरुदेव जिनिंग-प्रेसिंगवर छापा टाकला. त्यात सुमारे 62 लाखांचा बनावट कीटकनाशकांचा साठा जप्त केला. या कारवाईत बनावट कीटकनाशक, पीक संजीवके (पीजीआर) व कीटकनाशकांच्या पॅकिंगकरिता लागणारे साहित्य असा एकूण 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तपास पथकाने ही चारही ठिकाणे सील केली आहेत. या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करावा, अशी मागणी शेतकरी नेते देवानंद पवार व प्रवीण देशमुख यांनी केली आहे. 
जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनात हा तपास सुरू आहे. त्यांनी शनिवारी (ता. 15) रात्री सातला प्रत्यक्ष कळंब येथे भेट देऊन तपासांबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT