Dada Bhuse Esakal
महाराष्ट्र बातम्या

Dada Bhuse : हा *** शिवीगाळ करत दादा भुसेंची पोलिसांसमोर तरुणाला जबर मारहाण

मंत्री दादा भुसेंची तरुणांना पोलिसांसमोर मारहाण

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच शिंदे गटातील मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडिओ राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर वर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये मंत्री दादा भुसे यांच्यावर तरुणाला धमकावल्याचा आणि मारल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता विरोधकांनी शिंदे गटाच्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यानंतर आता दादा भुसे यांच्यावर आरोप केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटरवर हा व्हिडिओ शेयर केला असून त्यात मंत्री भुसे हे तरुणाला शिवीगाळ करत पोलिसांसमोर मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. परंतु हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान व्हिडीओ पोस्ट करताना जितेंद्र आव्हाड यांनी दादा भुसे यांच्यावर कारवाई कधी होणार? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करताना, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड लिहतात की, 'पोलिसांसमोर एखाद्या व्यक्तीला मारहाण करण्यात येत आहे, कायदा सुव्यवस्थेचं काय? मंत्री दादा भूसे फटकावतात. शिव्या देतात, मुख्यमंत्री साहेब... कुठला गुन्हा पोलिस घेणार... पोलिसांसमोर मारले.. माझा नग्न फोटो फेसबुकवर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलत. सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौज उभी केलीत. सुप्रीम कोर्टामध्ये रात्री त्या विकृत बरोबर आपली बैठक झाली... आता बोला', असा प्रश्नही आव्हाड यांनी विचारला आहे.

तर, व्हिडीओमध्ये मंत्री दादा भुसे या तरुणांला शिवीगाळ करत मारहाण करताना दिसत आहेत. या तरुणांची नेमकी चूक काय होती? कोणत्या कारणासाठी दादा भुसे तरुणांना मारहाण करत आहेत? हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे? याबबातची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर याची चर्चा सुरु आहे. यावर सत्ताधाऱ्यांकडून काय उत्तर देण्यात येतं ? विरोधक याबाबत हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार का? हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMCमध्ये चक्राकार पद्धतीने एसटी आरक्षण होतं, पण नियमाचा अडथळा; सोडतीबाबत स्पष्टीकरण

Chhatrapati Sambhajinagar Crime : जबरदस्तीने शरीरसंबंधाची मागणी; महिलेने मुलाला हाताशी धरून शेतकऱ्याचा काढला काटा

Latest Marathi News Live Update : नंदुरबार बाजार समितीत ओव्याची मोठी आवक

Mayor Reservation Lottery : विजय वडेट्टीवार यांनी नागपूरच्या महापौराचं नाव भाजपआधीच सांगितलं, आरक्षण सोडतीवर घेतला 'हा' आक्षेप

राष्ट्रवादीने वडिलांचं तिकीट कापलं, संतापलेल्या मुलानं आमदाराच्या कार्यालयासमोर केली लघुशंका; किळसवाणा प्रकार CCTVत कैद

SCROLL FOR NEXT