Manoj Jarange sakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : मंत्री देसाईंनी आंदोलनस्थळी भूमिका स्पष्ट करावी : जरांगे

‘‘मराठा आरक्षण हा छोटा विषय नाही. प्रसारमाध्यमांद्वारे बोलून तो सुटणार नाही. मंत्री शंभुराज देसाई यांनी आंदोलनस्थळी येऊन भूमिका स्पष्ट करावी.

राजेंद्र पाटील - सकाळ वृत्तसेवा

वडीगोद्री (जि. जालना) : ‘‘मराठा आरक्षण हा छोटा विषय नाही. प्रसारमाध्यमांद्वारे बोलून तो सुटणार नाही. मंत्री शंभुराज देसाई यांनी आंदोलनस्थळी येऊन भूमिका स्पष्ट करावी. सापडलेल्या कुणबी नोंदींच्या आधारे संबंधितांना वेळेत प्रमाणपत्र द्यावे. तिन्ही गॅजेट्स लागू करावीत. आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय शांत बसणार नाही,’’ असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

अंतरवाली सरटी (ता. अंबड) येथे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आज चौथा दिवस होता. त्यांची तब्येत खालावली आहे. वैद्यकीय उपचार घेण्यास त्यांनी नकार दिला आहे.

जरांगे म्हणाले, ‘‘माझ्यावर टीका करणाऱ्यांना उपोषण संपल्यावर उत्तर देणार आहे. मुंबईमध्ये मुख्यमंत्री शिंदे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात आरक्षणाबाबत काय काय चर्चा झाली, याबाबत काही माहीत नाही. ’’

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भात अडचणी येत होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सरकारने याची दखल घेत जात वैधता प्रमाणपत्रासाठी सहा महिने मुदतवाढ दिली आहे. याबद्दल त्यांचे कौतुक करतो, सरकारने चांगला निर्णय घेतला. मुख्यमंत्री शिंदे आरक्षण देऊ शकतात. त्यांनी लवकर हा प्रश्न निकाली काढावा. आमचे हाल करू नयेत.

- मनोज जरांगे, उपोषणकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

Milk Rate : पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक; वार्षिक उलाढाल ३८७ कोटीवर

SCROLL FOR NEXT