Narayan Rane esakal
महाराष्ट्र बातम्या

माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या BJP च्या पदाधिकाऱ्यांना 'धन्यवाद'

बाळकृष्ण मधाळे

केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे (Minister Narayan Rane) यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काल रत्नागिरीतून अटक करण्यात आली होती. राणेंच्या 'त्या' वक्तव्यानंतर याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्र्भर उमटले. अनेक ठिकाणी शिवसैनिकांकडून दगडफेक करत निषेध नोंदविला, तर दुसरीकडे राणेंच्या जामिनासाठी भाजपकडूनही प्रयत्न केले गेले. अखेर दिवसभराच्या हालचालीनानंतर मंगळवारी रात्री उशिरा मंत्री राणेंना जामीन मंजूर करण्यात आला. यावर राणेंनी प्रतिक्रिया देताना कालच्या प्रसंगाबद्दल पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

मंत्री राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की कालच्या प्रसंगामध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व माझ्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचा मी मनापासून आभार मानतो. कालच्या प्रसंगात ज्यांनी मला साथ दिली, त्यांनाही मी धन्यवाद देतो, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. तर, जामिनावर सुटका झाल्यानंतर राणेंनी 'सत्यमेव जयते' असं ट्विट केलं होतं.

नारायण राणे सध्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी रायगडमधील महाड येथे राणेंची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना राणेंनी, मुख्यमंत्री ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना राणेंनी हे विधान केलं होतं. या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्यांना अटकही झाली होती. त्याच दिवशी रात्री उशिरा त्यांची सुटका करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT