Thackeray vs Shinde  
महाराष्ट्र बातम्या

Thackeray vs Shinde : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

सर्वोच्च न्यायालयाकडून उद्धव गटाला अद्याप पूर्ण दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने निवडणूक आयोगाचा निर्णय कायम ठेवला आहे. म्हणजेच शिवसेना आणि धनुष्यबाण हे दोन्ही पक्ष शिंदे गटाच्या जवळ राहणार आहेत. निवडणूक आयोगाने उद्धव गटाला दिलेले मशाल आणि मशाल हे निवडणूक चिन्ह भविष्यातही कायम राहू शकते, असेही सांगण्यात आले आहे. याशिवाय न्यायालयाने शिंदे गट आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाला ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करता येणार नाही. तसेच व्हिप देखील बजावता येणार नाही. दरम्यान ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची भूमिका न्यायालयात मांडली. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत आम्ही नोटीस बजावली आहे ती कशी बरोबर आहे, हे कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केले. तसेच आयोगाच्या विरोधातील याचिकेवर न्यायालयाने २ आठवड्यांचा कालावधी दिला आहे. न्यायालयाने शिंदे गटाला देखील नोटीस बजावत उत्तर मागवले आहे. 

या काळात शिवसेनेकडून कोणताही व्हिप काढला जाणार नाही. म्हणजेच शिवसेनेच्या व्हिपमुळं ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार नाहीत. तसेच ठाकरे गटाचं मशाल हे चिन्ह २६ फेब्रुवारीनंतरही सुप्रीम कोर्टाचा पुढचा निर्णय येईपर्यंत हे त्यांच्याकडं कायम राहिलं. तसेच सरन्यायाधीश हे प्रकरण देखील स्वतःच्या अधिकारात ऐकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT