shiv sena crisis uddhav thackeray eknath shinde and rahul narvekar eSakal
महाराष्ट्र बातम्या

MLA Disqualified : आमदार अपात्रताप्रकरणी राहुल नार्वेकरांसह ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस

शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकाला विरोधात शिवसेना शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकाला विरोधात शिवसेना शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यात न आल्याने शिंदे गटाचे पक्ष प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे या याचिकेची आज न्यायालयाने दखल घेत नार्वेकर यांच्या सह सर्व १४ आमदारांना नोटीस बजावत उत्तर देण्याचे निर्देश दिले.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पक्षाच्या शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल करण्यात आल्या. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सप्टेंबर ते डिसेंबर २०२३ या कालावधीत शिवसेना आमदार अपात्रतेवर सुनावणी पूर्ण झाली. त्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी जाहीर केला.

राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना दिलासा देतानाच, ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवल नाही. ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवल्यामुळे आमदार भरत गोगावले यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. विधानसभा अध्यक्षांचा निर्णय मनमानीकारक, बेकायदेशीर व असंविधानिक आहे. रेकॉर्डवर सादर करण्यात आलेले पुरावे विधानसभा अध्यक्षांनी विचारात घेतले नाही.

इतकेच काय तर ठाकरे गटातील आमदारांनी स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडले होते हे लक्षात घेण्यात विधानसभा अध्यक्ष अपयशी ठरले असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवण्याचा आदेश रद्द करावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

त्यावर आज न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोष पुनिवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने सर्व पक्षकारांना याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश देत सुनावणी ८ फेब्रुवारी पर्यंत तहकूब केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुंबईत मुसळधार पावसाचा विमानसेवेवर मोठा परिणाम; उड्डाणे आणि लँडिंग प्रक्रियेत अडथळे

SCROLL FOR NEXT