Jaykumar Gore esakal
महाराष्ट्र बातम्या

'रामाची गोष्ट' सांगताना BJP आमदाराची झाली 'चूक'

संजय जगताप

मायणी (सातारा) : रामाची (Lord Shriram) नियत खराब होती, जयकुमारची नियत खराब नाही. त्यामुळे मी जिंकलो आहे, असं वक्तव्य माण मतदार संघाचे भाजपाचे आमदार जयकुमार गोरे (BJP MLA Jaykumar Gore) यांनी केले. खरेतर त्यांना रावणाची नियत खराब होती, असे म्हणायचे होते. मात्र, बोलताना गडबड झाली आणि लक्षात येताच त्यांनी ती तातडीने दुरुस्तही केली. वडूज (जि. सातारा) नजीक सातेवाडी (ता. खटाव) येथील विविध विकासकामांच्या भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

माझ्याकडे तर भाऊ नसतानाही मी जिंकलो आहे. कारण, रामाची नियत खराब होती.

त्यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (MP Ranjitsingh Naik-Nimbalkar), आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar), पिंपरी चिंचवड महानगर प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलासराव देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर व्यासपीठावर भाजपाचे तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष विकल्पशेठ शहा, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. वैभव माने, जयकुमार शिंदे, नगरसेवक अनिल माळी, वचनशेठ शहा, जयवंतराव पाटील, शहराध्यक्ष प्रदीप शेटे, संजय काळे, डॉ. प्रशांत गोडसे, नीलेश गोडसे, सोमनाथ जाधव, शशिकांत पाटोळे, श्रीकांत बनसोडे, रामभाऊ देवकर, विशाल बागल, सुनिल मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

राजकीय जय-पराजय बाबत बोलताना त्यांनी एका पत्रकाराचा हवाला देत रामायणातील दाखला दिला. ते म्हणाले, लढाईत रामाने रावणाला हरवले. रावण अखेरच्या घटका मोजत होता. तेव्हा रावणाने रामाला विचारले, माझ्याकडे एवढी सेना आहे. एवढी ताकद आहे. एवढे राक्षस आहेत. तुझ्याकडे तर फक्त वानरे आहेत. तरीही तू जिंकलास कसा? त्यावर राम म्हणाला, माझ्याकडे तुझा भाऊ बिभीषण होता. म्हणून लढाई जिंकलो, असे स्पष्ट करून आमदार गोरे म्हणाले, माझ्याकडे तर भाऊ नसतानाही मी जिंकलो आहे. कारण, रामाची नियत खराब होती. रामाची नियत खराब होती. आमदार गोरे असे दोन वेळा म्हणताच झालेली चूक श्रोत्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिली. रामाची नव्हे, रावणाची नियत खराब होती, असा गलका श्रोत्यांनी करताच गोरेंनी रावणाची नियत खराब होती, अशी चुकीची दुरुस्ती केली. त्यांच्या तोंडून हे विधान अनावधानपणे बोलले गेल्याचे श्रोत्यांच्या लक्षात येताच, सर्वत्र शांतता पसरली आणि गोरेंनी आपल्या चुकीची दुरुस्ती तात्काळ केली. त्यामुळे या विधानावर अखेर पडदा पडला आहे. मात्र, गोरेंचा हा व्हिडिओ भाषणानंतर तुफान व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT