cm eknath shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena : आमदार राजू पारवेंचा राजीनामा, शिवसेनेत प्रवेश; रामटेक मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी निश्चित?

CM Eknath Shinde : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा एक धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर आता उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेसला ‘हात’ दाखवत शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतला आहे. त्यांना रामटेक लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

निलेश डोये

CM Eknath Shinde : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा एक धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर आता उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेसला ‘हात’ दाखवत शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतला आहे. त्यांना रामटेक लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी साथ देणारे खासदार कृपाल तुमाने यांचा पत्ता कट झाला आहे. काँग्रेसच्या रश्मी बर्वे व पारवे यांच्यात सामना होणार आहे.

रविवारी मुंबईत त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसापासून पारवे काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा होती. त्याला आज पूर्णविराम मिळाला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात महायुतीची सत्ता आली. सरकारकडून अनेक कामांवर स्थगिती देण्यात आली होती. परंतु पारवे यांच्या मतदार संघातील कामांना मंजुरी मिळाली होती.

तेव्हापासून पारवे काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा रंगली होती. ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. रामटेक लोकसभेची उमेदवारी त्यांना हवी होती. परंतु ही जागा शिवसेनेकडे असल्याने त्यांचा प्रवेश निश्चित नव्हता. रामटेकच्या जागेसाठी शिंदे आग्रही होते. अखेर रामटेकची जागा शिंदेंकडे आली. त्यामुळे पारवे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचे बोलल्या जात आहे.

भाजपचा खासदार तुमाने यांना आधीपासूनच विरोध होता. त्यांचा सर्वे नकारात्मक आहे आणि ते पराभूत होतील, अशी शंका व्यक्त केली जात होती. यातून तोडगा काढण्यासाठी राजू पारवे यांना शिवसेनेत पाठवण्यात आल्याचे समजते. रविवारी मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर पारवे यांनी धनुष्यबाण हाती घेलता.

विधानसभेचे अध्यक्ष यांच्याकडे पारवे यांनी आमदारकीचा राजीनामा पाठवला. पारवे वर्षभरापासून भाजपच्या संपर्कात होते. अशोक चव्हाण यांच्या सोबत ते भाजप प्रवेश करणार होते. मात्र रामटेकचा निर्णय होत नसल्याने ते थांबले होते. अखेर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून सर्व चर्चा आणि अफवांना पूर्णविराम दिला.

काँग्रेसचं संख्याबळ झालं कमी

पारवे शिवसेनेत गेल्याने काँग्रेसचं संख्याबळ एकने कमी झाले आहे. नागपूर जिल्ह्यातील १२ जागांपैकी चार जागा काँग्रेसकडे होत्या. पारवेंच्या शिवसेना प्रवेशाने ही संख्या आता तीनवर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी वाढ! 4 दिवसांत 100 ग्रॅममागे तब्बल 60,000 रुपयांनी महागलं; मुंबई-पुण्यात आजचा भाव किती?

Fifa World Cup 2026: जपानच्या प्रशिक्षकाच्या 'फलका'ची चर्चा; नेदरलँड्सला रडवलं, मॅच होताच असं काही केलं की, ज्याने जिंकली मनं... Video

Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यातील धरणे गाठताहेत तळ; सरासरी २८ टक्के जलसाठा, आठही जिल्ह्यात हजारो गावांना टँकरचा आधार

थोडंसं काम करताच धाप लागते? फक्त फुफ्फुस नव्हे, रक्तही असू शकतं कारणीभूत; वेळीच हिमोग्लोबिन तपासण्याचा डॉक्टरांचा सल्ला

Nashik: त्र्यंबकेश्वरात १५० किलोंच्या शाळिग्रामचं मंदिर, राज्यातील महाकाय शाळिग्राम; कुशावर्तापेक्षा मोठ्या कुंडात गंगेसह सात नद्यांचं अन् ३ महासागरांचं तीर्थ

SCROLL FOR NEXT