Rohit Pawar_Misal Party
Rohit Pawar_Misal Party 
महाराष्ट्र

रोहित पवारांकडून मिसळची तुलना पुरणपोळीशी; फडणवीसांना लगावला टोला

Amit Ujagare (अमित उजागरे)

नगर : मतदारसंघात कार्यकर्त्यांनासोबत फिरत असताना आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एका हॉटेलात मिसळवर (Misal Pav) चांगलाच ताव मारला. पण या मिसळची तुलना त्यांनी थेट पुरणपोळ्यांशी (Puran Poli) करत थेट भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्यावर निशाणा साधला. अमृता फडणवीस (Amruta Fadnvis) यांच्या एका पोस्टमुळं देवेंद्र फडणवीस आणि पुरणपोळ्या हा विषय चर्चेत आला होता. (MLA Rohit Pawar compares Misal with Puran poli slammed on Devendra Fadnavis)

या मिसळ पार्टीवर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, "मतदारसंघात असताना भूक लागल्यानं माही जळगावमधील राहुल हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाल्ली. एकाच मिसळमध्ये पोट भरल्यानं '३५' मिसळ खाण्याच्या केवळ कल्पनेनंच कसंतरी झालं. आणि हो...मिसळ खाल्ल्यानंतर पैसे न देताच उठून गेलो नाही तर नेहमीप्रमाणे बिलही पेड केलं"

अमृता फडणवीसांनी सांगितला होता किस्सा

झी मराठीवर ‘किचन कल्लाकार’ हा कार्यक्रम सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमात नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आवडीच्या पदार्थांबाबात अनेक गोष्टींचा खुलासा केला होता.

जेवायला बसल्यानंतर एकाच वेळी देवेंद्र फडणवीस किती पुरणपोळ्या खाऊ शकतात? असा प्रश्न शोचा सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेनें अमृतांना विचारला विचारला. यावर अमृता यांनी ते 30 ते 35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचं असं म्हटलं होतं. तर ३०-३५ पुरणपोळ्या ते कसे खातात हे पाहायची इच्छा असल्याचेही त्या म्हणाल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: दिल्लीच्या विजयानं राजस्थानला मिळालं प्लेऑफचं तिकीट! आता उरलेल्या 2 जागांसाठी 5 संघात शर्यत, पाहा समीकरण

IPL 2024 DC vs LSG: दिल्लीने लखनौला मात देत राखला घरचा गड अन् स्पर्धेतील आव्हानही कायम; इशांतचा भेदक मारा ठरला निर्णायक

Chhagan Bhujbal: कोसळलेल्या होर्डिंगशी ठाकरेंचा काय संबंध? भुजबळांचा सरकारला घराचा आहेर

Animals computation: यंदा बुद्ध पोर्णिमेला होणार नाही प्राणी गणना! वरिष्ठांकडून कान उघडणी; काय घडलंय नेमकं?

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

SCROLL FOR NEXT