mns 
महाराष्ट्र बातम्या

MNS Vs Rahul Gandhi: राहुल गांधींच्या सभेठिकाणी निघालेल्या संदीप देशपांडे, नितीन सरदेसाईंना रोखलं! मनसे आक्रमक

शेगावला होणारी राहुल गांधींची सभा उधळण्याचा मनसे नेत्यांचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

बुलढाणा : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आक्रमक झाले आहेत. राहुल गांधींची सभा होणाऱ्या शेगावकडे ते निघाले असताना त्यांना पोलिसांनी बुलढाण्यातील चिखली इथं अडवलं, त्यामुळं या नेत्यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यातच ठिय्या मांडला. यावेळी राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या. (MNS Agitation against Rahul Gandhi at Buldhana for anti Savarkar Statement)

राहुल गांधी यांची आज शेगाव इथं जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, बुलढाण्यातून शेगावकडं जाणाऱ्या मार्गावर काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे फ्लेक्स लावले आहेत. हे फ्लेक्स मनसेच्या कार्यकर्त्यांनी फाडले आहेत. त्याचबरोबर आम्हाला शेगावला जाण्यापासून का रोखलं जात आहे असा सवाल मनसेच्या नेत्यांकडून केला जात आहे. तसेच आम्ही शेगावला जाणारचं असं त्यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

राहुल गांधींच्या शेगावच्या सभेत गोंधळ होणारच - अविनाश जाधव

अविनाश जाधव म्हणाले, "ज्या पद्धतीनं पोलीस वागत आहेत आणि काँग्रेस नेते घाबरले आहेत. जरी नेत्यांना अडवलं असलं तरी आमचे महाराष्ट्र सैनिक थांबणार नाहीत" राहुल गांधींच्या सभेत गोंधळ होणारचं असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आमच्या माणसांचा अपमान करणाऱ्या अतिशय फालतू माणसाचे बॅनर आम्ही फाडले आहेत, अशा शब्दांत राहुल गांधींवर जाधव यांनी टीका केली.

मनसे नेते पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, राहुल गांधींच्या सभेठिकाणी निघालेल्या मनसेच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांना बुलढाण्याच्या चिखलीच्या शासकीय विश्रामगृहात त्यांना ठेवण्यात आलं आहे. या नेत्यांमध्ये प्रकाश महाजन, अविनाश जाधव, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आणि काही स्थानिक नेत्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT