Raj Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे जालन्यासाठी रवाना ; मराठा आंदोलकांची घेणार भेट

सकाळ डिजिटल टीम

Raj Thackeray : जालना जिल्ह्यातील सराटी गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. याच्या विरोधात संपूर्ण राज्यातुन विविध स्तरांवर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

या आंदोलनस्थळी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संभाजीराजे छत्रपती , उदयनराजे भोसले, मंत्री गिरीश महाजन आदी नेत्यांनी भेट दिली आहे.

त्यांच्यावर झालेल्या लाठीचार्जचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध होत आहे. यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील त्या ठिकाणी जाऊन आंदोलकांची भेट घेणार आहेत.

राज ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे लाठीचार्जच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते. कालच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी फोनवरून संवाद देखील साधला होता.

आता स्वतः राज ठाकरे या ठिकाणी जाऊन आंदोलकांची भेट घेणार असून ते जालन्यासाठी रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. सकाळी १० वाजता हि भेट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : इशा सिंग अन् चीनच्या शाओनेचे समान ३८ गुण, तरीही भारतीय नेमबाजाला मिळाले रौप्यपदक; असं का?

Vinod Kambli Viral Video: विनोद कांबळी वृद्धाश्रमात असल्याचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं? पत्नी अँड्रियाने केला मोठा खुलासा

Maharashtra Drought Relief : मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Mumbai Malaria: मुंबईत मलेरियाचा वाढता धोका! रुग्णसंख्या ९ हजारांवर; वर्षभरात ४१ टक्क्यांनी वाढ

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आज ‘मामा गोल्ड रिंग योजना’ सुरू करणार

SCROLL FOR NEXT