mns chief raj thackeray appeal to mns party workers over his birthday on 14 june  
महाराष्ट्र बातम्या

वाढदिवसानिमीत्त राज ठाकरेंचं मनसैनिकांना कळकळीचं आवाहन

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज मनसे कार्यकर्त्यांना एका ऑडिओ क्लिपच्या माध्यामातून एक कळकळीचे आवाहन केले आहे. राज ठाकरे यांनी ट्वीटरवर याबाबत एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांना १४ तारखेला वाढदिवसानिमीत्त मनसे कार्यकर्त्यांना भेटायला घरी येऊ नका, अशी विनंती केली आहे. (mns chief raj thackeray appeal to mns party workers over his birthday on 14 june)

याआधी पुण्यात झालेल्या सभेत, राज ठाकरे यांनी त्यांच्या पायावरील शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली होती, मात्र कोरोना संसर्गामुळे त्यांची ती शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती, त्यानंकर राज ठाकरे यांनी हे आवाहन केले आहे. ते म्हणाले आहेत की, माझी एक शस्त्रक्रिया करायची आहे, त्यानंतर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तपासणीत कोविडचे डेड सेल आढळल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ते काय असतं हे मलाही आणि कोणालाच नाही माहिती नाही. त्यामुळे ती शस्त्रक्रिया रद्द झाली. त्यानंतर मी १०-१२ दिवस कोविडच्या नियमांप्रमाणे घरातच क्वॉरंटाईन आहे. त्या सगळ्या दरम्यान १४ तारखेला माझा वाढदिवस आहे. आपण सर्वजण दरवर्षी मा‍झ्या वाढदिवसाला प्रेमाने, उत्साहाने माझ्याकडे भेटायला येता. मीही आपल्या सर्वांची आतुरतेने वाट पाहातो. सर्वांना भेटल्यावर बरंही वाटतं, असे राज ठाकरे म्हणालेत

तसेच त्यांनी यापुढे बोलताना, पण, या वर्षी मला १४ तारखेला वाढदिवसाला कोणालाही भेटता येणार नाही. याचं कारण म्हणजे, त्या गाठी भेटीत परत जर संसर्ग झाला तर त्यातून मला परत जर शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागली, तर मी ती किती पुढे ढकलायची यालाही मर्यादा असते. त्यामुळे पुढल्या आठवड्यात माझी शस्त्रक्रिया ठरलेली आहे, त्यामुळे मी कुठल्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाही, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

याबरोबरच त्यांनी या कारणामुळे मी १४ तारखेला कुणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला आहे , असे सांगितले आहे. ते म्हणाले की, आपण जिथे आहात तिथेच राहा. माझी शस्त्रक्रिया पूर्ण होईल, जेव्हा मला बरं वाटेल तेव्हा मी आपल्या सर्वांना निश्चित भेटेन. पण, १४ तारखेला कृपया आपण कुणीही घरी येऊ नये, ही विनंती, असे ते म्हणालेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांना भेटता येणार नाही

दरम्यान यावर्षी राज ठाकरे हे १४ जून रोजी आपला ५४ वा वाढदिवस साजरा करणार आहेत. वाढदिवसानिमित्त त्यांना अनेक कार्यकर्ते भेटून शुभेच्छा देत असतात. मात्र यंदा राज ठाकरे यांच्या आरोग्याच्या कारणास्तव कार्यकर्त्यांना त्यांना भेटता येणार नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT