raj thakare solapur
महाराष्ट्र बातम्या

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सोलापुरात जंगी स्वागत! उद्या घेणार जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारासंघांचा आढावा; विधानसभा निवडणुकीची ठरणार रणनिती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच सोलापुरात एक मुक्काम व दुसऱ्या दिवशी दिवसभर सोलापुरात असणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला साथ दिल्यानंतर मनसे आता विधानसभा निवडणूक महायुतीसोबत लढणार की स्वतंत्रपणे लढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : येत्या विधानसभा निवडणुकीत मनसे ताकदीने मैदानात उतरणार असल्याची चिन्हे आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या (सोमवारी) दिवसभर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. रविवारी (ता. ४) त्यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जंगी स्वागत केले. सोलापुरातील सात रस्ता परिसरातील शासकीय विश्रामगृहाबाहेरही कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच सोलापुरात एक मुक्काम व दुसऱ्या दिवशी दिवसभर सोलापुरात असणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला साथ दिल्यानंतर मनसे आता विधानसभा निवडणूक महायुतीसोबत लढणार की स्वतंत्रपणे लढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात महायुती, महाविकास आघाडी होईल की नाही याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही, अशी सद्य:स्थिती आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांचा अंदाज घेणार आहे. यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेते दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, प्रशांत गिड्डे, सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनोद्दीन शेख, राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, युवक शहराध्यक्ष अभी रंपुरे यांची उपस्थिती असणार आहे. या बैठकांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरणार आहे. आता जिल्ह्यातील किती व कोणत्या मतदारसंघांमध्ये मनसे ताकदीने उतरणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

मनसेचे लक्ष ‘या’ मतदारसंघांवर

सोलापूर जिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघ असून त्यातील बार्शीसह जिल्ह्यातील सहा मतदारसंघात (माळशिरस, पंढरपूर-मंगळवेढा, शहर उत्तर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट) भाजपचे आमदार आहेत. दोन ठिकाणी (माढा व मोहोळ) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा सांगोल्यात एकमेव आमदार आहे. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे अपक्ष असून शहर मध्य विधानसभेच्या आमदार प्रणिती शिंदे आता खासदार झाल्या आहेत. या सर्व मतदारसंघांची सद्य:स्थिती व संभाव्य स्थितीचा अंदाज घेऊन दक्षिण सोलापूर, शहर मध्य, माळशिरस, शहर उत्तरसह इतरही काही मतदारसंघांमध्ये मनसे मोठ्या ताकदीने मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे जंगी स्वागत

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे प्रमुख राज ठाकरे रविवारी (ता. ४) सायंकाळी सातच्या सुमारास सोलापुरात आले. त्यांच्यासमवेत बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, बाबू वागस्कर, विनोद शिंदे हे नेते देखील आहेत. तत्पूर्वी, भीमानगरपासून टेंभुर्णी, माढा मोडनिंब, मोहोळ, लांबोटी, पाकणी, सोलापूर शहर अशा विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. सोलापूर शहरात पक्षाचे नेते दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जैनुद्दीन शेख ,प्रशांत इंगळे, विनायक महिंद्रकर, प्रशांत इंगळे, अमर कुलकर्णी, ॲड. कैलास खडके, अभि रंपुरे आदी पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थित होते. इतर पक्षातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मनसेत प्रवेश करणार असून त्यांच्यामुळे मनसेची ताकद आणखी वाढणार असल्याचा विश्वास मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली. तब्बल तीन वर्षानंतर राज ठाकरे सोलापूर दौऱ्यावर असल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT