Uddhav Thackrey Esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackrey : "मातोश्री वरचा सोंगाड्या..." शिल्लकसेना म्हणत मनसे प्रवक्त्याची जहरी टीका

मनसे प्रवक्ते गजानन काळेंनी सुषमा अंधारेंच्या टीकेला खोचक भाषेत उत्तर दिलं

सकाळ डिजिटल टीम

ठाकरे गटाच्या फायर ब्रॅंड नेत्या अशी ओळख असणाऱ्या सुषमा अंधारे यांनी मागील काही दिवसांपासून विरोधक त्याचबरोबर शिवसेनेतील बंडखोर आमदार, खासदार, मंत्री यांच्यावर महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने त्यांच्याच मतदर संघात त्यांच्यावर निशाणा साधताना दिसून येतात. त्या सातत्याने विरोधकांवर टीका करताना दिसतात. त्यांनी मुलुंड येथील सभेत राज ठाकरेंवर घणाघाती टीका केली होती त्यावर मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विट करत उत्तर दिलं आहे.

राज ठाकरे यांनी त्यांच्या एका कार्यक्रमादरम्यान उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना लोकांना भेटत नव्हते. ते घरून राज्याचा कारभार करत होते लोक भेटायला आले तर ते भेटत नसत अशी टीका केली होती. त्यावरून सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेच्या सभेदरम्यान राज ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. या टीकेनंतर मनसेही काही शांत बसलेली नाही. आता मनसे प्रवक्ते गजानन काळेंनी सुषमा अंधारेंच्या टीकेला खोचक भाषेत उत्तर दिलं आहे.

गजनन काले यांनी ट्विट करत सुषमा अंधारे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ट्विटमद्धे 'वक्तृत्व स्पर्धेत टाळया आणि बक्षीसं मिळावीत म्हणून "मनी म्याव"कायम भाषणं करत आली आणि त्याच सवयीचा गुलाम झाल्यामुळे वेडेवाकडे चाळे करत आता राजकारणात टिकू पाहतेय .. उष्माघाताने राहिलेली शिल्लकसेना पण जिवंत राहते की नाही या चिंतेत मातोश्री वरचा "सोंगाड्या"आणि सैनिक असल्याचं कळतंय असं म्हणत टीका केली आहे.

हे ही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

तर दुसऱ्या ट्विटमद्धे ते लिहतात की, महाराष्ट्रात वांद्रे मातोश्री येथे असा एक "सोंगाड्या" आहे जो सकाळी भगवा,दुपारी हिरवा आणि रात्री सप्तरंगात असतो… तरी बाईला कोण कधी उठतो व कधी झोपतो याचं जास्त पडलंय… वर्षभरात सोंगाड्याचा अनुभव आला की "गुळाची ढेप" मातोश्रीचा अंधार सोडून दुसऱ्या कळपात दिसली तर नवल वाटायला नको…अशा शब्दात टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला ३ हजार रुपये, पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग; राज्य सरकारचा मोठा निर्णय

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

शूटिंगदरम्यान ज्युनिअर एनटीआरला झालेली गंभीर दुखापत; खांद्यावर झाली शस्त्रक्रिया, आता 2 ते 3 महिन्यांचा घेणार ब्रेक

IND vs SL: शुभमन गिल-रिषभ पंत श्रीलंकेत धुमाकूळ घालणार? WTC मध्ये आजपर्यंत कोणालाही न जमलेला पराक्रम करण्याची संधी

Latest Marathi News Live Update : तुम्ही मला अस्पृश्यासारखी वागणूक देता, 'शुद्धीकरण' करता आणि माझा अपमान करता."- खर्गे राज्यसभेत संतापले

SCROLL FOR NEXT