Devendra Fadnavis
Devendra Fadnavis 
महाराष्ट्र

Loksabha 2019 : 'अर्धी चड्डी घालणाऱ्यांनी आमच्या कपड्यांची काळजी करू नये'

सकाळवृत्तसेवा

मुंबई : बारामतीचा पोपट अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्वतः अर्धी चड्डी घालणाऱ्यांनी आमच्या कपड्यांची काळजी करू नये असे म्हटले आहे.

महायुतीची रविवारी कोल्हापुरात सभा झाली. या सभेत मुख्य़मंत्र्यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत तुमचे सगळे कपडे आम्ही उतरविल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्री म्हणाले होते, की आमचे कपडे उतरविणारा जन्माला यायचा आहे. काही जण स्वतः बोलू शकत नाही, त्यामुळे त्यांनी पोपट नेमले आहेत. बारामतीचे पोपट बोलू लागले आहेत. आमचे कपडे कोणी उतरवू शकत नाहीत. तुमचे वेगवेगळ्या निवडणुकीत सगळे कपडे उतरविले गेलेले आहेत. कोणाची सुपारी घेण्यापेक्षा घरी शांत बसा.

या टीकेनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटले आहे, की स्वतः अर्धी चड्डी घालणाऱ्यांनी आमच्या कपड्यांची काळजी करू नये, नाहीतर उरलेली चड्डी पण काढून घेण्यात येईल. आता याला भाजप कसे प्रत्युत्तर देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : विभव कुमार यांना आजच कोर्टासमोर हजर केलं जाणार

Indian Team Coach : द्रविड, लक्ष्मणनंतर ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाचाही नकार; हेड कोच निवडताना बीसीसीआयची वाढणार डोकेदुखी?

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, दु:ख सहन न झाल्याने सहकलाकारानेही संपवलं जीवन!

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT