Mohit Kamboj Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

मोहित कंबोज यांच्या अटकेची तयारी सुरु? नव्या ट्विटमुळे खळबळ

मोहित कंबोज यांनी तीन कॅबिनेट मंत्र्यांवर आरोप केल्यानंतर दोन नवे ट्विट केले आहेत.

सुधीर काकडे

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर भाजप आणि संबंधित लोकांकडून गंभीर आरोप केले जात आहेत. त्यानंतर आता मोहित कंबोज यांनीही काही गंभीर आरोप केले आहेत. आर्यन खान क्रूज ड्रग्ज प्रकरणी (Aryan Khan Drugs Case) मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Panday) यांनी गुन्हा दाखल करण्याचा मानस व्यक्त केला आहे. आयुक्तांच्या या भूमिकेचं भाजप कार्यकर्ते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी स्वागत केलं आहे. तसंच या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील (MVA Govt) तीन कॅबिनेट मंत्र्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप करत याची चौकशी व्हावी अशी मागणीही कंबोज यांनी केली. त्यानंतर आता त्यांनी आपल्याला अटक करण्याची तयारी सुरु असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

मला अटक होणार आहे असं दिसतंय! जय भवानी जय शिवाजी ! गुन्हा निश्चित नसतो, मात्र गुन्हेगार निश्चित असतो. आघाडी सरकारचा अंधार! असं म्हणत त्यांनी दोन नवे ट्विट केले आहेत. त्यामुळे आता त्यांना अटक होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. कंबोज यांनी आातपर्यंत अनेकदा नवाब मलिक, संजय राऊत आणि ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा एकदा तीन मंत्र्यांवर गंभीर आरोप केलेत.

मोहीत कंबोज यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलं की, मुंबई पोलीस आयुक्तांकडून आर्यन खान केसची थांबवलेली चौकशी पुन्हा सुरु करण्याचा मानस व्यक्त केला आहे, त्यांच्या या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. क्रूझ केसशी संबंधीत एनसीबीचे अधिकाऱ्यांकडून या प्रकरणात भ्रष्टाचार झाला असून याच्या चौकशीसाठी जी एसआयटी बनवली होती. ही एसआयटी आता बंद करण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं. त्याची पुन्हा चौकशी करण्याची गरज असल्याचं नव्या पोलीस आयुक्तांनी म्हटलंय, याचं मी स्वागत करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction: कॅमेरॉन ग्रीनसाठी ऐतिहासिक बोली! KKR अन् CSK मध्ये जोरदार रस्सीखेच; बनला सर्वात महागडा परदेशी खेळाडू

Hasan Mushrif : ‘आम्ही केलं; आता जबाबदारी तुमची’ शेंडा पार्क वैद्यकीय नगरीत मंत्री हसन मुश्रीफ यांचा ठाम संदेश

Virat-Anushka Meet Premanand Maharaj : प्रेमानंद महाराज यांनी विराट-अनुष्काला सांगितला रावणाच्या मृत्यूनंतरचा 'तो' प्रसंग, नेमकं काय म्हणाले? वाचा...

Mumbai News: गोराईत रडार, दहिसरमध्ये विकास; राज्य सरकारचा मोठा निर्णय, गृहनिर्माण प्रकल्पांना गती

IPL 2026 Auction : गडी पेटला... सर्फराज खानने २२ चेंडूंत चोपल्या ७३ धावा, ३३१.८२ चा स्ट्राईक रेट; सेलिब्रेशन तर भन्नाटच Video Viral

SCROLL FOR NEXT