anil parab esakal
महाराष्ट्र बातम्या

मंत्री शंभूराज देसाईंसह मनपा आयुक्तांविरोधात हक्कभंग सादर; अनिल परब आक्रमक, उपसभापती म्हणाल्या...

संतोष कानडे

मुंबईः राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचाच आवाज यंदाच्या अधिवेशनामध्ये गाजत असल्याचं दिसून येतंय. आज परब यांनी मंत्री शंभूराज देसाई आणि मुंबई मनपा आयुक्त इक्बाल चहल यांच्यासह दोन अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग सादर केला.

महापालिकेत सॅनिटरी नॅपकिन मशीन खरेदी-विक्रीत गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा अनिल परब यांनी उपस्थित केला होता. याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलं नाही. महापालिकेत बैठक घेऊ असं म्हणाले होते. तीही बैठक झाली नाही.

अनिल परब सभागृहात म्हणाले की, आम्हाला जर उत्तरच मिळत नसेल तर आम्ही यायचंच कशाला? मी प्रश्न उपस्थित केला त्याला मंत्री शंभूराज देसाई हे देत असलेल्या उत्तरात तफावत होती. मी म्हणत होतो उत्तर आपल्याला माहित नसेल तर तुम्ही ते देऊ नका, तुम्ही काही दिवसांसाठी त्या खात्याचे मंत्री आहात, त्यावर तेच म्हणाले मी उत्तर देतो. मी हक्कभंगाला सामोर जायलाही तयार आहे. त्यामुळे मी म़त्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात व पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल याच्या विरोधात विशेष हक्कभंग सादर करतो. असं अनिल परब म्हणाले.

अनिल परब यांनी आयुक्त इक्बाल चहल यांच्यासह एकूण दोन अधिका-यांविरोधात हक्कभंग मांडला. त्यावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी हक्कभंग योग्य आहे की नाही, हे तपासून याबाबत निर्णय घेईन, असं स्पष्ट केलं.

अनिल परब यांच्या निवेदनातील मुद्दे...

  • भ्रष्टाचार करणारे चोर यांनी काहीही केले तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही

  • कारवाई फक्त अनिल परब आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई होते

  • आम्हाला सुरक्षा म्हणून फक्त एक गार्ड दिला जातो … आणि त्यांच्या पक्षातील साध्या कार्यकर्त्याला पाहिजे तेवढे सुरक्षा रक्षक दिले गेलेत … ज्यांनी खोके घेतले त्यांना सुरक्षा दिली जातेये

  • G20 कार्यक्रम केंद्राचा आणि खर्च पालिकेतून करतायेत

  • मुंबइ मनपा निधी मध्ये पालकमंत्र्यांचा काय अधिकार आहे?

  • निधी देवून पक्षात प्रवेश दिला जातोय आणि जो येत नाही त्याला निधी दिला जात नाही

  • हा पैसा आमचा आहे आम्ही टॅक्स भरतोय, पालकमंत्र्यांचा पालिका निधी वाटण्यात संबंध काय?

  • याचे शिकार ओरीजनल बीजेपीवाले पण झालेत. भाजपातील अनेकांना बोलायचे आहे पण ते बोलूच शकत नाहीत

  • प्रवीण दरेकर यांची अवस्था बघा त्यांची व्यथा ते मांडू शकत नाहीत, मी मित्र म्हणून मांडतोय

  • आम्ही धोरण केले होते आणि सर्वांना निधी दिला होता, ज्यांनी ज्यांनी घोटाळे केलेत त्या सर्वांची चौकशी करा

  • आम्ही भ्रष्टाचार केला असेल हे चौकशीत सिद्ध झाले तर आम्हाला फासावर लटकवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT