Monsoon
Monsoon 
महाराष्ट्र

मॉन्सून आज घेणार महाराष्ट्राचा निरोप

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (ता. १५) संपूर्ण विदर्भ, मराठवाड्यातून माघार घेतली आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्राच्या आणखी काही भागांसह बहुतांशी राज्यातून मॉन्सून परतला आहे. आज (ता. १६) मॉन्सून महाराष्ट्राचा, तर उद्या (ता. १७) संपूर्ण देशाचा निरोप घेण्याची शक्यता आहे.

मॉन्सून देशभरातून परतताच ईशान्य, पूर्व आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रीय होणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. 

सोमवारी (ता. १४) जवळपास निम्म्या महाराष्ट्रातून माघार घेत मॉन्सूनने विदर्भाचा संपूर्ण भाग, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांचा निरोप घेतला होता. तर मंगळवारी विदर्भ, मराठवाड्याचा संपूर्ण भाग, कोकणातील रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील सोलापूरपर्यंतच्या भागातून माघार घेतली. संपूर्ण ओडिशा, छत्तीसगडसह उत्तर कर्नाटक, तेलंगाणा, आंध्रप्रदेशच्या काही भागांतून मॉन्सून परतला आहे.

गेल्या आठवड्यात बुधवारी (ता. ९) पंजाब, हरियाणा आणि उत्तर राजस्थानमधून मॉन्सून माघारी फिरला. यंदाचा मॉन्सून आतापर्यंतच्या सर्वांत उशिराने परतीच्या प्रवासाला निघाला. यापूर्वी १ ऑक्टोबर १९६१ मध्ये सर्वांत उशिराने माघारी फिरला होता. त्यांनतर २००७ मध्ये ३० सप्टेंबर रोजी राजस्थानातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला होता.

साधारणत: १ सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास सुरू करणारा मॉन्सून सव्वा महिना उशिराने माघारी फिरला. त्यांनतर आठवडाभरातच मॉन्सून देशातील बहुतांशी भागातून परतला आहे. महाराष्ट्रातून साधारणत: १५ ऑक्टोबरला मॉन्सून परत जातो. आज (ता. १६) मॉन्सून राज्यातून, तर उद्या (ता. १७) संपूर्ण देशातून परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT