Satbara Utara Maharashtra esakal
महाराष्ट्र बातम्या

आता 'सातबारा'वरही लागणार आईचं नाव; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय, अर्जदाराला कोणते पुरावे द्यावे लागणार? जाणून घ्या..

भूमी अभिलेख विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, यापुढे सातबारावर आईचं नाव लागणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्याच्या काळात महिलांची नावे लावताना महिलेचे स्वतःचे नाव, पतीचे नाव आणि आडनाव असा क्रम आहे.

वडूज : राज्य सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारी कागदपत्रांमध्ये महिलांच्या नावाचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यानंतर आता सातबारावर (Satbara Utara) अर्जदाराच्या नावानंतर आईच्या नावाचा समावेश करण्यात येणार आहे. याबाबत सूचना भूमी अभिलेख विभागाने (Land Records Department) दिल्या आहे. यामुळे आता सातबारा उताऱ्यावर आईचंही नाव दिसणार आहे.

भूमी अभिलेख विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, यापुढे सातबारावर आईचं नाव लागणार आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये अंमलबजावणी केली जाणार आहे. हा नवा नियम एक मे २०२४ नंतर ज्या व्यक्तीचा जन्म होईल, अशा व्यक्तींसाठी लागू होणार आहे. नियमानुसार, एक मे २०२४ नंतर जन्म झालेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदी केल्यानंतर सातबारावर अर्जदारासोबत आईच्या नावाचा समावेश होणार आहे.

तसेच पूर्वीच्या व्यक्तीच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेशाची येत्या सहा महिन्यांत अंमलबजावणी सुरू होणार आहे. दरम्यान, सध्याच्या काळात महिलांची नावे लावताना महिलेचे स्वतःचे नाव, पतीचे नाव आणि आडनाव असा क्रम आहे. मात्र सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावताना त्यांचे आधीचे म्हणजे लग्नापूर्वीचे नाव देखील लावण्याची मुभा असेल.

शहानिशा केल्यानंतरच होणार नोंद

कोणते पुरावे द्यावे लागतील? येत्या सहा महिन्यांत जुन्या व्यक्तींच्या नावासोबत आईच्या नावाचा उल्लेख करणे शक्य होणार आहे. त्यासाठी त्या व्यक्तीला ती महिला त्याची आई असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या नावासोबत त्याच्या आईचे नाव लावले जाणार आहे. त्यासंदर्भातील आवश्यक पुरावा दाखल केल्यानंतर त्याची तलाठ्यामार्फत शहानिशा केल्यानंतरच नोंद होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT