Sanjay Raut Criticized PM Modi esakal
महाराष्ट्र बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काँग्रेसबद्दलचं विधान अत्यंत चुकीचं : राऊत

सकाळ डिजिटल टीम

'कोरोना काळात महाराष्ट्र सरकारानं चांगलं काम केलं. याची दखल खुद्द WHO नं घेतली.'

कोरोना काळात महाराष्ट्र सरकारानं चांगलं काम केलं. याची दखल खुद्द WHO नं घेतली. मुंबई महानगरपालिकेचंही काम कौतुकास्पद होतं, असं WHO नं म्हंटलं होतं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं काँग्रेसबद्दलचं विधान अत्यंत चुकीचं आहे, असं स्पष्ट मत शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केलं. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर मोदी तसं बोलले असतील, अशी टीकाही त्यांनी केली. (Sanjay Raut Statement on PM Modi)

भारतानं कोरोनाच्या संकटावर मात केलीय, पण कोरोना महामारीतही विरोधकांनी राजकारण केलंय. देशभरात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार आहे. कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्र काँग्रेसनं मजुरांना स्थलांतर करायला लावलं. परप्रांतियांना तिकिटं काढून देऊन स्थलांतर करण्यास भाग पाडलं, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काल केला आहे. पंतप्रधान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना बोलत होते. मोदींच्या या आरोपांना उत्तर देताना खासदार राऊत यांनी पंतप्रधानांवर टीका केलीय.

सध्या पाच राज्यांच्या निवडणुका सुरु आहेत आणि याचाच फायदा भाजपला घ्यायचा आहे, त्यामुळंच मोदींनी काँग्रेसवर कोरोना संसर्ग पसरवल्याचा आरोप केलाय. कोरोना महामारीत महाराष्ट्र सरकारनं अत्यंत चांगलं काम केलंय, याची दखल खुद्द WHO नं घेतली. परंतु, मोदींना हे कौतुक दिसत नसावं. मात्र, त्यांनी केलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत. महामारीच्या काळात कोणत्याही पक्षानं राजकारण केलं नाही, असं सांगत राऊत यांनी काँग्रेस पक्षाची पाठराखण केलीय. निवडणुकीमुळीच मोदींनी काँग्रेसवर खोटे आरोप केले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''मी 'आरएसएस'चेही रक्षण करणार'', राहुल गांधींचं मोठं विधान, संघाबद्दल नेमकं काय म्हणाले?

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

मला तिचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत... लेकीच्या रिलेशनशिपवर संजय जाधव यांचं स्पष्ट मत; म्हणाले, 'तुम्ही घरी या, बोला, पण...'

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT