LokSabha Election maharashtra  sakal
महाराष्ट्र बातम्या

LokSabha Election: भाजप आमदारांना देणार खासदारकीचं तिकीट; राज्यातील 'या' मंत्र्यांची नाव चर्चेत

Chinmay Jagtap

LokSabha Election: 2024 च्या लोकसभा निवडणूकीचे वेध सध्या संपूर्ण देशाला लागले असून राज्यातही सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महाराष्ट्रातून एकूण ४८ खासदार निवडून येतात. यामुळे महाराष्ट्रात अधिकाधिक खासदार निवडून आणण्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.

यातच भाजप आपल्या आमदारांना राज्यातून खासदारकीची तिकीट देईल असे म्हटले जात आहे. महाराष्ट्रातील सहा-सात आमदारांना भाजप लोकसभा निवडणुकीत उतरवेल असे म्हटले जात आहे. मध्यप्रदेशमध्ये तीन केंद्रीय मंत्री आणि चार खासदारांना आमदारकीचे तिकीट देऊन भाजपने मोठी खेळी केली आहे.

अशीच खेळी भाजप महाराष्ट्रात खेळेल असे म्हटले जात आहे. फक्त राज्यात त्याचे उलटे होईल असे म्हटले जात आहे. भाजपचे दिग्गज नेते तथा राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आकाश फुंडकर , राम सातपुते, मंत्री रवींद्र चव्हाण, संजय केळकर याच्या नावांची सध्या चर्चा आहे.

शिंदेंचे आमदारांनीही लोकसभा निवडणुक लढवावी असा आग्रह भाजपचा असल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने आपल्या मंत्र्यांना आणि दिग्गज नेत्यांना लोकसभेसाठी संधी द्यावी, असा आग्रह भाजपकडून केला जात असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT